

Bhandara Highway Blocked
भंडारा : लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येण्यास अडचण निर्माण होत असल्याने संतप्त झालेल्या बहिणींनी भंडाऱ्यात राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला. शुक्रवारी झालेल्या या प्रकाराने पोलीस प्रशासनात खळबळ माजली होती.
लाडक्या बहिणींना त्यांच्या बँक खात्यात पैसे आले नाहीत. कुठे नाव बेपत्ता झाले तर अनेकांना अपात्र ठरविण्यात आले. केवायसी करूनही पैसे येत नसल्याने महिला संतप्त झाल्या. शुक्रवारी या महिला जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील राष्ट्रीय महामार्गावर एकत्र आल्या. त्यांनी महामार्ग रोखून धरला. सुमारे दीड तास त्यांनी महामार्ग रोखून धरत प्रशासनाला जेरीस आणले.
अखेरीस एक शिष्टमंडळ जिल्हाधिकारी यांना भेटला. आश्वासन मिळाल्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आले. यावेळी वाहतूक मोठया प्रमाणात प्रभावित झाली होती.