

Baby Found in Bag Lakhni
भंडारा: लाखनी पोलिस ठाण्यांतर्गत पिंपळगाव सडक येथील शेतजमिनीला लागून एका बॅगमध्ये नवजात शिशु आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना मंगळवारी (दि.१३) दुपारच्या सुमारास उघडकीस आली.
मानेगाव सडक येथील शेतजमिनीला लागून असलेल्या झाडाजवळ एका काळ्या रंगाच्या बॅगमध्ये ८ ते १० दिवसांचा नवजात स्त्री जातीचा बाळ सापडले. या माहितीवरुन लाखनीचे पोलिस निरीक्षक सुभाष बारसे घटनास्थळी पोहोचले. बॅगची पाहणी केली असता त्यामध्ये एक स्त्री जातीचे नवजात बाळ मिळून आले. त्या बाळाला तात्काळ ग्रामीण रुग्णालय लाखनी येथे नेण्यात आले. तेथे उपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे दाखल करण्यात आले.