Bhandara RTO News | विना क्रमांकाच्या अवजड वाहनांकडे परिवहन विभागाचे दुर्लक्ष; अपघात झाल्यास जबाबदार कोण ?

अशा वाहनांतून झाडे, रेती, मुरूम, दगड-गोटे, मॅग्नीज व कोळशाची अवैध वाहतूक
 Unregistered Heavy Vehicles in  Bhandara
भंडाऱ्यात विना नंबरची शेकडो अवजड वाहने दिवस-रात्र धावत आहेत.(Pudhari Photo)
Published on
Updated on

Unregistered Heavy Vehicles in Bhandara

भंडारा: जिल्ह्यात दररोज विना नंबरचे शेकडो अवजड वाहने दिवस-रात्र धावत आहेत. अशा वाहनांमुळे वाहतुकीला त्रास तर होत आहेच, परंतु अपघात झाल्यास जबाबदार कोण, परिवहन कार्यालय, महसूल विभाग, पोलिस प्रशासन याकडे लक्ष देणार का?, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

वेळोवेळी परिवहन विभाग आणि पोलिस विभाग वाहनांची तपासणी करीत असते. तपासणीमध्ये वाहनधारकास कागदपत्रे नसणे किंवा वाहतूक नियमांचे उल्लंघन केले म्हणून दंड आकारला जातो. दुचाकीवरून जाताना अशा दंडात्मक कारवाईला वाहनधारकांना सामोरे जावे लागते. परंतु, महामार्गावरुन अनेक विना नंबरची वाहने सर्रासपणे धावत असतात. अशा वाहनांमधून वृक्षतोड केलेली झाडे, रेती, मुरूम, दगड-गोटे, मॅग्नीज व कोळशाची वाहतूक होते. अशा वाहनांमधून वाहतूक करण्यात येणाऱ्या गौण खनिजाची तपासणी होते, का असाही प्रश्न आहे.

 Unregistered Heavy Vehicles in  Bhandara
Bhandra Crime |भंडारा येथे दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार

भंडारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहनाची पासिंग व इतर कामे केली जातात. मात्र, अवजड वाहने विनाक्रमांकाची धावत असताना याकडे मात्र, परिवहन विभागाकडून जाणीवपूर्वक लक्ष दिले जात नाही. दुसरीकडे, परिवहन विभागाचे अधिकारी दररोज आपल्या वाहनाने राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्गावरील वाहनांवर लक्ष ठेवून असतात. परंतु, त्यांना ही विना नंबरचे अवजड वाहने दिसत नसावीत का? हा प्रश्न आहे.

परिवहन अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

कायद्यानुसार कुठलेही वाहन खरेदी केल्यानंतर त्या वाहनावर परिवहन विभागाकडून नंबर दिला जातो. तो नंबर वाहनाच्या नंबर प्लेटवर लिहूनच सदरील वाहन रस्त्यावर धावेल, असा शासनाचा नियम आहे. परंतु काही ठरावीक वाहनांवर मात्र शासनाचा हा नियम लागू होत नाही का? अशा वाहनधारकांकडून वाहतूक नियमांचे सर्रासपणे उल्लंघन होत आहे.

 Unregistered Heavy Vehicles in  Bhandara
भंडारा : ३ हजाराची लाचप्रकरणी सहाय्यक महसूल अधिकारी 'लाचलुचपत'च्या जाळ्यात

अवजड वाहनांकडे दुर्लक्ष; लहान वाहनांना दंड

दरवर्षी मार्च महिन्यात महसूल विभागाकडून काही वाहनांवर कारवाई करून दंड वसूल केला जातो. परंतु, यानंतर या विभागाचे अशा वाहनांकडे दुर्लक्ष होतच असते. एरव्ही दुचाकी चालकाकडे कागदपत्रे झेरॉक्स आहे का? दुचाकीवर समोरच्या बाजूला नंबर नसणे, इंडिकेटर तुटलेला असणे अशा छोट्या कायदेशीर बाबी पुढे करून मोठ्या प्रमाणावर दंड आकारला जातो. परंतु मोठ्या अवजड वाहनाकडे मात्र दुर्लक्ष केले जाते.

शासन कितीही दावे करीत असले तरी रेती चोरी बंद झालेली नाही. दिवसाढवळ्या अवैध रेतीचे ट्रक विना नंबरचे धावत आहेत. महसूल विभाग व पोलिस प्रशासनाचा या चोरीचा व्यवसायामध्ये सहभाग असल्याचे यावरुन दिसून येते.

-शिशुपाल पटले, माजी खासदार भंडारा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news