Bhandara news: ४ दिवसांवर लग्न, खरेदीसाठी नवरी घरी आली अन् नवरदेवाने जीवन संपवलं; नेमकं घडलं काय?

घरात लग्नाची लगबग, पाहुण्यांची ये-जा आणि चार दिवसांवर येऊन ठेपलेला शुभमुहूर्त... असे आनंदी वातावरण असताना लग्नापूर्वीच नवरदेवाने गळफास घेऊन जीवन संपवले.
Bhandara news
Bhandara newsfile photo
Published on
Updated on

Bhandara news

भंडारा: घरात लग्नाची लगबग, पाहुण्यांची ये-जा आणि चार दिवसांवर येऊन ठेपलेला शुभमुहूर्त... असे आनंदी वातावरण असताना लग्नापूर्वीच नवरदेवाने गळफास घेऊन जीवन संपवले. भंडारा जिल्ह्यात लाखांदूर तालुक्यातील परसोडी पावळदवना येथे ही घटना घडली. राजेश अविनाश भेंडारकर असे या मृत तरुणाचे नाव असून, या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Bhandara news
POCSO Case: मेहुणीला पडलेल्या स्वप्नामुळे हवाई दलाच्या जवानाला भोगावा लागला तुरुंगवास; ७ वर्षांनंतर सत्य आले समोर

राजेश भेंडारकर हा तरुण चंद्रपूर येथील दालमिया कंपनीमध्ये गेल्या तीन वर्षांपासून सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होता. त्याचे लग्न १६ मार्च रोजी एरंडी येथील वैष्णवी दोनोडे या तरुणीशी ठरले होते. अवघ्या चार दिवसांवर लग्न आल्याने घरात उत्साहाचे वातावरण होते. मात्र, मंगळवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास राजेशने घराबाहेरील आंब्याच्या झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास लावून जीवन संपवले. सकाळी हा प्रकार उघडकीस येताच कुटुंबियांवर दुखाचा डोंगर कोसळला.

साहित्य खरेदीसाठी नवरी आली होती सासरी

मिळालेल्या माहितीनुसार, लग्नाच्या खरेदीसाठी नवरी मुलगी सुद्धा ११ मार्च रोजी राजेशच्या घरी आली होती. सर्व काही सुरळीत सुरू असताना राजेशने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेमुळे विवाहाच्या आनंदाचे रूपांतर क्षणात शोकात झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पालांदूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला असून, पोलिस अधिक तपास करत आहेत.

Bhandara news
Reel star Arun Tupe death: रील स्टार अरुण तुपेचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news