भंडारा : वीज अंगावर पडून शेतकऱ्याचा मृत्यू

भंडारा येथे अंगावर वीज पडून शेतकऱ्यांचा मृत्यू
भंडारा येथे अंगावर वीज पडून शेतकऱ्यांचा मृत्यू
Published on
Updated on

भंडारा, पुढारी वृत्तसेवा : टाकळी (भोसा) येथे शेतात काम करत असताना अंगावर वीज कोसळुन शेतकऱ्याचा मृत्यू झाला. शनिवारी (दि.16) सायकांळी ही घटना घडली. कचरू नामदेव ढेंगे (वय. 35, रा. टाकळी भोसा) असे मृत शेतकऱ्यांचे नाव आहे.

शनिवारी ढेंगे हे शेतात काम करत होते. सायंकाळच्या सुमारास अचानक वादळवाऱ्याला सुरुवात झाली. यानंतर काही ठिकाणी जोरदार  विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरु झाला. या पावसात कचरु ढेंगे याच्या अंगावर वीज कोसळली. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले. यानंतर त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात केले होते. परंतु, उपचारादरम्यान ढेंगे यांचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात शोकाकुळ पसरलेला आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news