

Lakhandur Pimpalgaon Kohali Farmer Death
भंडारा: पशुधनासाठी चारा गोळा करणे एका शेतकऱ्याच्या जीवावर बेतले. शेळ्यांसाठी झाडावरील फांद्या तोडताना अचानक खाली पडल्याने ४८ वर्षीय शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला.
गुरुदेव गणु शेंडे (रा. पिंपळगाव कोहळी) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (दि. ३१) सकाळी ७ वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील पिंपळगाव कोहळी येथे घडली.
चाऱ्यासाठी फांद्या तोडण्याच्या उद्देशाने गुरुदेव हे मंगळवारी पहाटे गावाजवळील जंगल परिसरात गेले होते. झाडावर चढून ते फांद्या तोडत असताना, अचानक तोल गेल्याने गुरुदेव शेंडे थेट जमिनीवर कोसळले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. परिसरात कुणीही नसल्याने मदतीला उशीर झाला.