

Nagpur Hingna MIDC accident
भंडारा : लाखनी येथील रहिवासी आणि नागपूरच्या रायसोनी कॉलेजमध्ये अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षाचा विद्यार्थी जहीन कुरेशी (वय २०) याचा हिंगणा एमआयडीसी कॅम्पसमध्ये झालेल्या अपघातात जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री उशिरा जहीन एका मित्रासोबत जेवण केल्यानंतर मोटारसायकलवरून त्याच्या वसतिगृहात परतत असताना अचानक एका ट्रकने त्यांच्या मोटारसायकलला धडक दिली.
अपघात इतका भीषण होता की, जहीनचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच्या मागे बसलेला सहकारी गंभीर जखमी झाला. जखमी विद्यार्थ्याला तात्काळ लता मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे आणि तपास सुरू केला आहे.
या अचानक झालेल्या अपघाताच्या बातमीने लाखनीमध्ये धक्का बसला. अभियंता होण्याचे स्वप्न पाहणारा हुशार, शिस्तप्रिय विद्यार्थी जहीनच्या मृत्यूने कुटुंब, मित्र नातेवाईकांना मोठा धक्का बसला आहे.