Bhandara Congress Protest | विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेसचा भंडाऱ्यात निषेध मोर्चा; राहुल गांधींसह विरोधी नेत्यांवरील कारवाईचा निषेध

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भंडारा येथे निषेध मोर्चाचे आयोजन
Congress Protest March Bhandara
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भंडारा येथे निषेध मोर्चाचे आयोजनPudhari
Published on
Updated on

Congress Protest March Bhandara

भंडारा : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार माजी मंत्री तथा काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी भंडारा येथे निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्ज, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावरील कारवाईचा निषेध तसेच नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

विश्रामगृह येथून सुरू झालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. आंदोलनादरम्यान केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

Congress Protest March Bhandara
Bhandara Rain | भंडारा जिल्ह्यात पावसाच्या आगमनानंतर शेती कामांना वेग

यावेळी बोलताना यशोमती ठाकूर यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर लाठीचार्ज झाल्याचा निषेध व्यक्त करत, विद्यार्थ्यांच्या समर्थनासाठी उभ्या राहिलेल्या विरोधी पक्षाच्या नेत्यांवर करण्यात आलेली कारवाई लोकशाहीच्या मूल्यांना बाधा पोहोचवणारी असल्याचे म्हटले. विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी काँग्रेस पक्ष संघर्ष सुरू ठेवेल, असेही त्यांनी सांगितले.

भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मुकुंद साखरकर यांनी नीटसह विविध परीक्षांमधील पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. विद्यार्थ्यांचे भविष्य, लोकशाही आणि संविधानाच्या संरक्षणासाठी काँग्रेसचा लढा सुरू राहील, असे त्यांनी नमूद केले.

Congress Protest March Bhandara
Bhandara News | अड्याळ ग्रामपंचायतीत लाखोंचा घोटाळा: सरपंचावर गुन्हा दाखल

जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जाची उच्चस्तरीय चौकशी, राहुल गांधी व अखिलेश यादव यांच्यावरील कारवाईचा निषेध, नीट व इतर परीक्षांमधील पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई तसेच विद्यार्थ्यांच्या भविष्याचे संरक्षण करण्याची मागणी करण्यात आली.

या आंदोलनात माजी मंत्री यशोमती ठाकूर, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष मुकुंद साखरकर यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, एनएसयूआय, सेवा दल आणि विविध आघाड्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news