Bhandara Tinku Khan Case | टिंकू खान हत्याकांडातील साक्षीदाराला जीवे मारण्याची धमकी

साक्षीदारासह कुटुंबाला संपविण्याची धमकी
 Crime News
Crime NewsFile Photo
Published on: 
Updated on: 

भंडारा: शहरातील बहूचर्चित टिंकू खान हत्याकांडातील साक्षीदार आणि त्याच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी भंडारा पोलिसांनी तीन अल्पवयीन आणि तीन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौदागर मोहल्ला, अन्सारी वॉर्ड, भंडारा येथील फराझ अलीम खान (२८) हा मुस्लिम लायब्ररी चौकातील एका दुकानात होता. त्यावेळी बाबा मस्तान शाह वॉर्ड येथील अयान शेख (२०), उजेफ ऊर्फ लाला (१७), तौशिक पठाण आणि त्यांचे अन्य तीन साथीदार दुचाकीवरून तेथे आले.

 Crime News
Bhandara News | लोखंडी गेट अंगावर कोसळून चिमुरडीचा मृत्यू

आरोपींनी फराझ खान याला घेरून टिंकू खान हत्याकांडात न्यायालयासमोर साक्ष दिल्यास त्याला आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच, कारागृहातून त्यांचा भाऊ बाहेर आल्यानंतर संपूर्ण कुटुंबाला संपविण्याची किंवा खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकीही दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर शिवीगाळ करून आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. या प्रकरणी फराझ खान याच्या तक्रारीवरून भंडारा पोलिस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news