Bhandara Drowning Incident : रिल्सचा नाद बेतला जीवावर; खणीत बुडून युवकाचा मृत्यू

Drowning Incident : मित्र शुट करत होता व्हिडीओ , डोळ्यासमोरच मित्राचा अंत
Drowning Incident |
रिल्सचा नाद बेतला जीवावर; खणीत बुडून युवकाचा मृत्यू Pudhari File Fhoto
Published on
Updated on

भंडारा : व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर टाकण्याचा नादात एका १७ वर्षीय तरुणाने जीव गमावला. खणीत उडी मारून पोहत असलेल्या व्हिडिओ मोबाईलवर चित्रित करणाऱ्या मित्राच्या डोळ्यादेखत युवकाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि.६) सायंकाळी ५ वाजता अड्याळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत चुल्हाड शेतशिवारातील खाणीत घडली. तिर्थराज धनपाल बारसागडे (वय १७, रा. सोनेगाव/बुटी त. पवनी) असे मृत युवकाचे नाव आहे.

Drowning Incident |
Child Death | मृत्यूचे चक्र थांबेना ! पुन्हा एका चिमुरड्याचा खड्ड्यात बुडून मृत्यू

तिर्थराज याला रिल्स बनवून तो व्हिडिओ सोशल मिडियावर टाकण्याची आवड होती. रविवारी सायंकाळी तो चुल्हाड शिवारातील खाणीजवळ गेला. व मित्राला मोबाईल देऊन पाण्यात पोहत असलेला व्हिडिओ बनविण्यास सांगितले. त्यानंतर तिर्थराज याने खणीत उडी मारली. पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला. मित्राला पोहता येत नसल्याने त्याने मोबाईलवरून गावातील तरूणांना व कुटुंबियांना याची माहिती दिली. व परिसरात आरडाओरडा केला. मात्र परिसरातील नागरिक येईपर्यंत तिर्थराज याचा मित्राच्या डोळ्यादेखत बुडून मृत्यू झाला. या घटनेची नोंद अड्याळ पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

Drowning Incident |
Boisar Children Drown | बोईसरमध्ये खड्ड्यातील पाण्यात बुडून सख्ख्या भावांसह चिमुकल्याचा मृत्यू ; एक मुलगा बचावला

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news