भंडारा : कुलरचा शॉक लागल्याने युवकाचा मृत्यू

भंडाऱ्यातील मालदा येथील घटना
Young Noy Died Due to Electric Shock
विजेच्या धक्याने तरुणाचा मृत्यूPudhari Photo

भंडारा, पुढारी वृत्तसेवा : मालदा येथे करंट लागून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना रविवारी (दि.7)सायंकाळी उघडकीस आली. महेश परसराम खोब्रागडे (वय.25 रा. मालदा) असे मृताचे नाव आहे. महेश हा घरातील कुलर सुरु करायला गेला होता. तेव्हा त्याला विजेचा करंट लागल्याने त्याचा मृत्यू झाला.

महेश अविवाहित असून तो मालदा येथे आपली आई आणि लहान भावांसोबत राहत होता. रविवारी सायंकाळच्या सुमारास महेश घरातील कुलर सुरू करण्यासाठी गेला. कुलरचा प्लग इलेक्ट्रिक बोर्डात लावत असताना महेशचा हात कुलरच्या पिनच्या अर्थिंग वायरला लागला. यात त्याला करंट लागून तो जखमी झाला. ही घटना कुटुंबीयांच्या लक्षात येतात त्यांनी विद्युत पुरवठा खंडित करून जखमी अवस्थेत असलेल्या महेशला उपचारासाठी दिघोरी मोठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी महेशला तपासून मृत घोषित केले.

Young Noy Died Due to Electric Shock
कोपार्डेत शॉक लागून दोघा सख्या भावांचा मृत्यू; मुलांना अग्नी देण्याची वडिलांवर वेळ, पंचक्रोशी हळहळली

या घटनेची माहिती दिघोरी मोठी पोलिसांना होताच दिघोरीचे पोलिस उपनिरीक्षक अजय मडावी, हवालदार घनश्याम कोडापे, नवनाथ सिदने, अजित शेळके यांनी घटनास्थळी भेट देत घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news