Two brothers died due to electric shock
दोन सख्या भावांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू Pudahri File Photo

कोपार्डेत शॉक लागून दोघा सख्या भावांचा मृत्यू; मुलांना अग्नी देण्याची वडिलांवर वेळ, पंचक्रोशी हळहळली

शेतात तणनाशक औषध मारत असताना घटना

मलकापूर : कोपार्डे ता.शाहूवाडी येथील कडवी नदीजवळ असणा-या शेतात रोप लावून तणनाशक मारण्यास गेलेल्या सुहास कृष्णा पाटील (वय-३६) व स्वप्नील कृष्णा पाटील (वय-३१) या दोन्ही सख्या भावाना शेतातील अतिउच्य वीजेच्या तारेचा स्पर्श होऊन त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली.  त्याच्या मृत्यूने संपूर्ण कोपार्डे गावात शोककळा पसरली आहे.     

Two brothers died due to electric shock
Kolhapur Crime News : राजारामपुरी येथे युवकाचा दगडाने ठेचून खून

पोलिस घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, सुहास व स्वप्नील दोघे भाऊ भात रोप लावण आटपून दुपारी पिकांवर तणनाशक मारण्यासाठी शेताकडे गेले होते. तणनाशक मारत असताना सुहासला वीजेच्या तारेचा जोरदार धक्का बसून तो शेतात पडला असता, दादा काय झाल असे म्हणत स्वप्नील त्यांच्याजवळ गेला असता त्यालाही वीजेचा धक्का बसून दोघे भाऊ शेतात निपचित पडले. यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आपली दोन्ही मुले अजून घरी का आली नाहीत म्हणून त्यांचे वडिल कृष्णा पाटील तेथे गेले असता दोन्ही मुले गतप्राण झाल्याने ते भांबवून गेले. त्यांनी आरडा ओरड केली असता गावातील लोकांनी धाव घेऊन त्यांना आधार दिला. दोन्ही कमवती मुले काळाने हिरावून घेतल्याने वडिल हताश झाले. दरम्यान या घटनेचा पंचनामा शाहूवाडी पोलिसांनी करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी मलकापूर ग्रामीण रूग्णालयात रवाना करण्यात आले.

Two brothers died due to electric shock
भंडारा : ६ वर्षीय विद्यार्थिनीचा शाळेत विजेच्या धक्क्याने मृत्यू

आपली दोन्ही मुले मृत्यू झाल्याची घटना आईला व सुहासच्या पत्नीस समजताच दोघींनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. दोन्ही मुलाच्या मृत्यूने संपुर्ण पाटील कुटुंबच उद्वस्त झाले आहे. जिवंतपणी मुलांना अग्नी देण्याची वेळ वडिलांवर आली. दोघे ही मितभाषी स्वभावाचे होते. शाहूवाडी येथील चणवाड फाट्यावर गाड्या सर्व्हिसींगचे दुकान आहे. दोघे ही मितभाषी स्वभावांची  व सर्वात मिळून मिसळून राहणारे भावाचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गावातील लोकांच्यातून हळहळ व्यक्त केली जात होती.त्याच्या मागे आई-वडिल,सुहास ची पत्नी व.एक वर्षीची मुलगी असा परिवार आहे.अधिक तपास सहाय्यक फौजदार संभाजी पाटील करीत आहेत.दरम्यान शाहूवाडी वीज वितरणचे उप कार्यकारी अभियंता प्रविण कुंभारे यांनी घटनास्थळी भेट दिली.ही घटना महावितरणच्या हलगर्जीपणामुळेच घडल्याचे ग्रामस्थातून व्यक्त केले जात होते.पाटील कुटुंबास यांची तातडीने महावितरणने भरपाई द्यावी.अशी मागणी ग्रामस्थांच्यातून होत आहे.

logo
Pudhari News
pudhari.news