Bhandara Accident | दोन अपघातात एकाचा मृत्यू, दोघे गंभीर, पवनी मार्गावरील घटना

वनी राज्यमार्गावर झालेल्या दोन अपघातांमध्ये ७० वर्षीय वृद्धाचा मृत्यू
 Accident News
Accident News pudhari photo
Published on
Updated on

Pawni Road Accident
भंडारा:
पवनी राज्यमार्गावर झालेल्या दोन अपघातांमध्ये ७० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला असून दोघेजण गंभीररित्या जखमी झाले आहेत. पहिली घटना सोमवारी रात्री ९.४५ वाजताच्या सुमारास गिरोला बसस्थानकाजवळ घडली.  गजानन चरण शेंडे (वय ३८) आणि दुधराम खराबे (वय ७०, दोघेही रा. चांदोरी ता. भंडारा) हे दुचाकीने भंडाऱ्याकडून पवनीकडे जात असताना पवनीकडून भंडाऱ्याकडे येणाऱ्या कार क्रमांक एमच ४९ सीडी ०१५० ने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.

यात गजानन यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली  तसेच दूधराम यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. दोघांनाही उपचारासाठी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता दूधराम खराबे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

 Accident News
Bhandara News : आंबाडीत चहाच्या टपरीवर रानडुकराचा हल्ला, एक जण जखमी; घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद

दुसरी घटना दवडीपार-खापा गावाजवळ घडली. यादव सीताराम निखार (वय ५१, रा. खात रोड भंडारा) हे दुचाकीने भंडाऱ्याकडून पवनीकडे जात असताना त्याच दिशेने जाणाऱ्या अज्ञात दुचाकीने खापा गावाजवळ त्यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली.

यात यादव यांच्या डोक्याला व  पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांना भंडारा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोन्ही अपघातातील जखमींना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news