Bhandara Politics | ‘मी इथेच बसणार’ उपनगराध्यक्षांचा अट्टाहास; पवनीच्या नगराध्यक्षांनी दालनाबाहेर मांडले बस्तान

Pavni Nagar Parishad Dispute | पवनी नगरपरिषदेत खुर्चीवरुन रणकंदन
Pavni  President vs Vice President
वºहांड्यात बसून कामकाज करताना नगराध्यक्षा डॉ. विजया नंदूरकर. Pudhari
Published on
Updated on

Pavni Municipal Council

भंडारा : पवनी नगरपरिषदेत नगराध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे स्वतंत्र दालन असताना, ‘मी इथेच बसणार’ या अट्टहासापोटी उपाध्यक्षांनी नगराध्यक्षांच्या दालनात बाजूला बसण्याची व्यवस्था केल्याने खुर्चीवरून रणकंदन माजले. अखेरीस आज जनतेच्या कामांसाठी नगराध्यक्ष डॉ. विजया नंदूरकर यांनी दालनासमोरील पॅसेजमध्ये जमिनीवर बस्तान मांडून कामकाजाला सुरुवात केली. सकाळच्या सुमारास घडलेल्या या प्रकाराची संपूर्ण पवनीत चर्चा आहे.

डिसेंबर महिन्यात झालेल्या पवनी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या डॉ. विजया राजेश नंदूरकर नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या. मात्र त्यांचे दोनच नगरसेवक निवडून आल्याने बहुमतापासून वंचित राहावे लागले. भारतीय जनता पार्टीचे १३, शिवसेनेचे ४ व १ अपक्ष नगरसेवक आहेत. भाजपचे १३ नगरसेवक असल्याने उपाध्यक्ष म्हणून सोनू बावनकर यांची वर्णी लागली.

Pavni  President vs Vice President
Bhandara Bribe Case : राज्य कर निरीक्षकाला ३५ हजारांची लाच घेताना अटक

मुख्याधिकारी यांनी नगराध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समिती सभापती यांना बसण्यासाठी वेगवेगळे दालन दिले असतांना ‘मी नगराध्यक्षांच्या बाजूला बसणार’ अशी भूमिका भाजप गटाने घेतली. प्रजासत्ताकदिनी ध्वजारोहणानंतर नगरपरिषदेत गटनेते सुरेश अवसरे यांच्या नेतृत्वात ठिय्या मांडून नगराध्यक्षांच्या दालनाला कुलूप ठोकले होते. दुसºया दिवशी यातील एकाने मुख्याधिकारी यांचेकडे चाबी दिल्याने बंदिस्त असलेले दालन मोकळे झाले.

सर्वकाही सुरळीत झाल्याचा अंदाज बांधत नगराध्यक्ष नंदूरकर आज गुरुवारी कक्षात गेल्या असता तिथे बाजूला उपाध्यक्ष यांची खुर्ची दिसली. परिणामी वादंग न करता त्या वºहांड्यात जमिनीवर कामकाज चालविण्यासाठी बसल्या. नगर परिषदेच्या इतिहासातील ही पहिलीच घटना असल्याने जनतेच्या भुवया उंचावल्या आहेत. या नाट्यमय घडामोडींची मुख्याधिकारी निलेश इंगोले यांनी दखल घेत दालनात बसण्यासाठी पत्र दिला. नगराध्यक्षांना कक्षात सन्मानपूर्वक बसता आल्याने दुपारी ३ वाजता या परिस्थितीवर पडदा पडला.

Pavni  President vs Vice President
Bear Attack Bhandara | साकोली तालुक्यात अस्वलाच्या हल्ल्यात गुराख्याचा मृत्यू

नगरपरिषदेत अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समिती सभापतींचे दालन असल्याने प्रत्येकांनी आपापल्या दालनात बसून शहर विकासाचा आराखडा निर्माण करावा व जनतेच्या समस्यांना प्राधान्य द्यावे. हेवे-दावे विसरून एकत्रितपणे काम करावे. प्रशासकीय स्तरावर आमचे सहकार्य राहील.

- निलेश इंगोले,मुख्याधिकारी, न.प. पवनी

शहराचा विकास व जनतेची कामे करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळे मी नगराध्यक्ष पदावर निवडून आले. यातून जनतेचे हित साधावे हा मुख्य उद्देश आहे. मी काम करणारी प्रतिनिधी असल्याने कुठेही बसून शहर विकासाचे कार्य करण्यास तसूभर मागे येणार नाही.

- डॉ. विजया राजेश नंदूरकर, नगराध्यक्ष, पवनी

माझ्या दालनाची साफसफाई नसल्यामुळे मी नगराध्यक्षांच्या कक्षाचा वापर जनतेच्या समस्या ऐकून घेण्यासाठी केला होता. आता निर्माण वाद संपुष्टात आला असून मला मिळालेल्या दालनातच बसून जनतेच्या समस्यांचा निपटारा करण्यात येईल.

- सोनू बावनकर, उपाध्यक्ष न. प. पवनी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news