Bhandara Protest | भंडाऱ्यात काढली ईव्हीएम मशीनची प्रतिकात्मक शवयात्रा

भंडारा नगरपरिषद निवडणुकीतील गैरव्यवहाराविरोधात सर्वपक्षीयांचा निषेध मोर्चा
EVM Symbolic Funeral Procession
सर्वपक्षीयांनी मिळून ईव्हीएम मशीनची प्रतिकात्मक शवयात्रा काढून निषेध मोर्चा काढला.Pudhari
Published on
Updated on

EVM Symbolic Funeral Procession

भंडारा : भंडारा नगरपरिषद निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान प्रभाग ३ मधील उमेदवाराचे नाव व नोटा ईव्हीएममधून बेपत्ता झाल्याने ईव्हीएम आणि निवडणूक आयोगाविरुद्ध संताप निर्माण झाला. तक्रार करुनही कारवाई न झाल्याने सोमवारी (दि.२९) सर्वपक्षीयांनी मिळून ईव्हीएम मशीनची प्रतिकात्मक शवयात्रा काढून निषेध मोर्चा काढला. यातील दोषींवर तात्काळ कारवाईच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाºयांना देण्यात आले.

संपूर्ण देशात यापूर्वीही ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर वेळोवेळी अविश्वास व्यक्त करण्यात आला आहे. भंडारा नगरपरिषद निवडणुकीच्या इतिहासात प्रथमच असा प्रकार घडला की मतदान होऊनही व मतमोजणीदरम्यान ईव्हीएम मशीनवर उमेदवार प्रभाग ३च्या उमेदवार करुणा राऊत तसेच ‘नोटा’ यांचे निकाल प्रदर्शित न होता थेट निकाल जाहीर करण्यात आला.

EVM Symbolic Funeral Procession
Bhandara Raid News | भंडाऱ्यातील 'सुमनोहर सेलिब्रेशन लॉन'वर जिल्हा पुरवठा विभागाचा छापा

हा प्रकार लोकशाही प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा असून, या एकाच घटनेमुळे ईव्हीएम प्रणालीवरील विश्वासार्हता पूर्णत: धोक्यात आली आहे. या गंभीर प्रकरणाविरोधात लोकशाही मार्गाने आवाज उठवण्यासाठी तसेच निवडणूक आयोग व प्रशासनाचे लक्ष वेधून सत्य बाहेर आणण्यासाठी सोमवार, २९ डिसेंबर रोजी भंडारा येथे सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला.

हा मोर्चा हुतात्मा स्मारक, शास्त्री चौक येथून निघून त्रिमूर्ती चौक येथे सभेत रूपांतरित झाला. मोर्चामध्ये भाजप वगळता सर्वपक्षांचे जिल्हाध्यक्ष, नेते, पदाधिकारी, निवडणुकीत पराभूत झालेले नगराध्यक्ष पदाचे व नगरसेवक पदाचे उमेदवार, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

EVM Symbolic Funeral Procession
Bhandara Accident | लाखांदूर येथे ट्रॅक्टर दुभाजकाला धडकला; चार वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू; चालक जखमी

भंडारा नगरपरिषदेची निवडणूक ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर पुन्हा घेण्यात यावी, या गंभीर प्रकारास जबाबदार असलेल्या दोषी अधिकाºयांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, या मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी फालकेयांनी मोर्चास्थळी उपस्थित राहून स्वीकारले. मागण्या पूर्ण न झाल्यास १२ जानेवारी रोजी भंडारा जिल्हा बंद करण्याचे आवाहन करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news