Bhandara Drowning Incident | सुरनदीत बुडून तरूणाचा मृत्यू

मोहाडी तालुक्यातील खोडगाव येथे घटना
Sur River Young Man Drowns
सलभ मोहन कडवPudhari
Published on
Updated on

Sur River Young Man Drowns

भंडारा: धार्मिक कार्यक्रमासाठी आलेल्या युवकाचा सूर नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना मोहाडी तालुक्यातील खोडगाव येथे मंगळवारी (दि. २) दुपारच्या सुमारास घडली.

भंडारा येथील शिवनगरीतील कडव कुटुंब धार्मिक कार्यक्रमासाठी खोडगाव येथे गेले होते. मंदिरात दर्शन घेतल्यानंतर सलभ मोहन कडव (वय ३२) सूर नदीपात्रात आंघोळीसाठी उतरला. परंतु, खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तो नदीच्या प्रवाहात वाहत गेला.

Sur River Young Man Drowns
Bhandara Accident | एसटीच्या चाकाखाली आल्याने तरुणाचा मृत्यू; महिला गंभीर जखमी  

पाण्याचा थेंब नसलेली खोडगाव येथील सूर नदी नुकतीच पेंच प्रकल्पाच्या पाण्यामुळे दुथडी वाहत आहे. यात सलभला पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून त्याचा मृत्यू झाला.

सलभ हा उच्चशिक्षित असून तो एका फायनान्स कंपनीमध्ये काम करायचा. आई सेवानिवृत्त शिक्षिका असून वडील एका पतसंस्थेमध्ये काम करतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news