Bhandara Loan Recovery | कर्जवसुलीसाठी शेतकरी कुटुंबाला घराबाहेर काढून ठोकले कुलूप

तुमसर तालुक्यातील वाहनी येथे थकबाकी वसुलीसाठी फायनान्स कंपनीची मनमानी
Tumsar House Locked For Loan Recovery
Tumsar House Locked For Loan Recoverypudhari
Published on: 
Updated on: 

Tumsar House Locked For Loan Recovery

भंडारा: कर्जाचे हप्ते थकल्याच्या कारणावरून खासगी फायनान्स कंपनीच्या प्रतिनिधींनी शेतकरी कुटुंबाला घराबाहेर काढून घराला कुलूप ठोकल्याची संतापजनक घटना तुमसर तालुक्यातील वाहनी येथे शुक्रवारी (दि.२०) घडली. कर्त्या मुलाच्या निधनाने आणि दुष्काळी परिस्थितीमुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या कुटुंबाचे संसारोपयोगी साहित्यही घराबाहेर काढण्यात आले. या प्रकाराची माहिती मिळताच ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी धाव घेत कंपनीच्या प्रतिनिधींना जाब विचारला. त्यांच्या हस्तक्षेपानंतर घराचे कुलूप काढून कुटुंबाला पुन्हा घरात प्रवेश देण्यात आला.

विष्णू कनपटे यांनी घर बांधण्यासाठी २०२३ मध्ये  सितारा हाऊसिंग या खासगी फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले होते. सुरुवातीचे काही हप्ते नियमित भरले जात होते. मात्र, तीन ते चार महिन्यांपूर्वी कुटुंबातील कर्त्या मुलाचे निधन झाले. त्यातच जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक अडचणी वाढल्या आणि कर्जाचे हप्ते थकले.

Tumsar House Locked For Loan Recovery
Bhandara ST Depot News | रात्रीच्या अंधारात मुलींना रस्त्यावर सोडले; भंडारा आगारातील दोन एसटी कर्मचारी निलंबित

हप्ते थकल्याच्या कारणावरून कंपनीचे प्रतिनिधी शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास थेट घरी पोहोचले. त्यांनी कुटुंबाला घराबाहेर काढत घराला कुलूप लावले. घरातील संसारोपयोगी साहित्यही बाहेर काढण्यात आले. कुटुंबात लहान नातवंडे आणि वृद्ध सदस्य असताना थंडीच्या दिवसांत त्यांच्यावर बेघर होण्याची वेळ आली.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी धाव घेतली. कंपनीच्या प्रतिनिधींना जाब विचारत या कारवाईचा निषेध करण्यात आला. कर्जाची रक्कम भरणे शक्य न झाल्यास गावातून लोकवर्गणी करून ती उभी करू; मात्र कुटुंबाला घराबाहेर काढू नका, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली. त्यांच्या आक्रमक हस्तक्षेपानंतर अखेर घराचे कुलूप काढण्यात आले आणि कुटुंबाला पुन्हा घरात राहण्यास देण्यात आले.

Tumsar House Locked For Loan Recovery
Bhandara ST Depot News | रात्रीच्या अंधारात मुलींना रस्त्यावर सोडले; भंडारा आगारातील दोन एसटी कर्मचारी निलंबित

सक्तीच्या वसुलीवर प्रश्नचिन्ह

दुष्काळग्रस्त परिस्थितीत शेतकऱ्यांकडून सक्तीने कर्जवसुली करू नये, अशा शासनाच्या सूचना असतानाही कंपनीच्या प्रतिनिधींनी अशी कारवाई केल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांची मुदत मागितली; मात्र ती नाकारण्यात आली. कोणतीही पूर्वसूचना न देता घरातील साहित्य बाहेर काढण्यास भाग पाडल्याची व्यथा कुटुंबातील सदस्याने मांडली. या घटनेने खासगी फायनान्स कंपन्यांच्या कर्जवसुलीच्या पद्धतीवर आणि अशा कारवाईवर नियंत्रण ठेवण्याच्या यंत्रणेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.