

भंडारा: राष्ट्रीय महामार्गावरील सेंदुरवाफा टोल नाक्याजवळ शनिवारी रात्री उशिरा झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. डिझेल भरण्यासाठी थांबलेल्या ट्रकला मागून भरधाव ट्रकने जबर धडक दिल्याने हा प्रकार घडला. मृतकाची ओळख शादीक अली (वय ३५, रा. पिपरगड्डी, ता. डुमरीयागंज, जि. सिध्दार्थनगर, उत्तरप्रदेश) अशी करण्यात आली आहे. अपघातात तो ट्रकच्या मागील टायरखाली चिरडला गेला.
सिराज कलिममुल्ला खान (वय २०, रा. पिपरगड्डी, ता. डुमरीयागंज, जि. सिध्दार्थनगर, राज्य-उत्तरप्रदेश) हा शादीक अलीसोबत ट्रकमध्ये डिझेल भरत होता. त्यावेळी मागून भरधाव वेगाने येणारा ट्रकचा चालक बरुनकुमार सरमाई सानटा (वय ४८, रा. मदनापुर, बंगाल) याने निष्काळजीपणाने ट्रकला धडक दिली.
या धडकेत शादीक अली हा गंभीररित्या जखमी होऊन जागीच ठार झाला. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिष बोरकर, पो.स्टे. साकोली यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.