

भंडाराः भंडारा शहरातील विद्यानगर येथील एका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून ४.२८ लाख रुपयांच्या रोख रकमेसह १०.८४ लाख रुपयांचा माल जप्त केला. भंडारा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उल्हास भुसारी यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी, ८ नोव्हेंबर रोजी रात्री ही कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान १७ जुगाऱ्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
भंडारा पोलिसांना विद्यानगर येथील केतन प्रवीण ठकराल याच्या घरी जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली. पोलिस निरीक्षक उल्हास भुसारी यांनी त्यांच्या पथकासह छापा टाकला. त्यात एकूण १७ आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून ४,२८,५०० रुपयांची रोख रक्कम, १,३३,००० रुपयांचे १७ मोबाईल फोन, ५,२०,००० रुपयांची कार, दोन दुचाकी आणि २,५५० रुपयांचे इतर साहित्य असा एकूण १०,८४,०५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक नुरुल हसन, अतिरिक्त पोलिस अधीक्षक नीलेश मोरे, उपविभागीय पोलिस अधिकारी विलास काळे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलिस निरीक्षक उल्हास भुसारी यांच्या नेतृत्वाखाली, सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश खंदाडे, सहाय्यक उपनिरीक्षक मोहरकर, कुथे, भोंगाडे, महिला पोलिस कॉन्स्टेबल शेंडे, बंबावले, राठोड यांनी केली.
या आरोपींचा समावेश
प्रतीक किरण लेंडे (वय ३२, रा. छोटा बाजार, भंडारा); नितीन रेवाराम सव्वालाखे (३०, रा. शुक्रवारी, भंडारा); केतन प्रवीण ठकराल (वय ३८, रा. विद्यानगर); जियाउद्दीन खुर्शीद शेख (वय २७, रा. पेट्रोल पंप ठाणा); ललित सुरेश भोयर (वय ३२, रा. राजीव गांधी चौक, भंडारा); तुषार सुरेश लांजेवार (वय ३२, रा. खात रोड, भंडारा); प्रवीण शंकर साकोरे (वय ३५, रा. शुक्रवारी, भंडारा); राजेश नथुजी भुजाडे (वय ४९, रा. चांदणी चौक, भंडारा); सुरेश भावराव सार्वे (वय ३६, रा. गुंजेपार), मयूर पांडुरंग सूर्यवंशी रा. नेहरू वॉर्ड, भंडारा; विपीन विजय तांडेकर रा. गौतम बुद्ध वॉर्ड भंडारा; सतीश अशोक मोगरे (वय ४८, रा. कस्तुरबा गांधी वार्ड); चंद्रशेखर सदाशिव मडामे (४५) रा. सुरेवाडा; नेहाल अण्णाजी राऊत (वय २८) रा. राजेंद्र वॉर्ड झोपडपट्टी, हरिकिशन अभिमान तांडेकर (वय ३७, रा. आंबेडकर वॉर्ड), कलाम हनीफ खान (३८, रा. बैरागी वाडा), कुणाल प्रमोद चुन्ने (३२, रा. शुक्रवारी) यांचा समावेश आहे.