

Road Accident At Night Bhandara
भंडारा : नागपूर-रायपूर महामार्गावरील अजीमाबाद (कोरंभी) येथील नवीन बायपासजवळ शुक्रवारी रात्री 9:10 वाजता झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील चौघे गंभीर जखमी झाले. भरधाव कारने मागून दिलेल्या जबर धडकेत मोटारसायकलवरील सर्वजण रस्त्यावर फेकले गेले.
जखमींमध्ये परसोडी येथील देविदास मुरलीधर नान्हे (वय 37), त्यांची पत्नी कविता नान्हे (वय 32), मुलगी चेतना (वय 8) व मुलगा दिव्यांश (वय 5) यांचा समावेश आहे. हे चौघेही दुचाकी (MH 36 J 1688)वरून लाखनीहून घरी परतत असताना, होंडा सिटी कारने त्यांना जोरदार धडक दिली.
अपघाताची माहिती मिळताच जगद्गरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या सेवाभावी रुग्णवाहिकेतील चालक प्रमोद मोहतुरे यांनी घटनास्थळी तात्काळ पोहोचून जखमींना लक्ष हॉस्पिटल, भंडारा येथे दाखल केले.
या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.