Bhandara Bribery Case | भंडारा पोलीस ठाण्यातील लाचखोर पोलिस फरार

अटकपूर्व जामीनासाठी प्रयत्न सुरू
Bribe News
Bribe News
Published on: 
Updated on: 

Bhandara Police Bribery Case

भंडारा:
तक्रारदाराविरुद्ध आलेल्या तक्रारीतील केस कमकुवत करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी भंडारा पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक रमेश संपतराव खाडे (वय ३८) आणि पोलिस शिपाई रवीकुमार बाबुराव आडे (वय ३८) यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून हे दोन्ही पोलिस कर्मचारी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. त्यांचे अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे.

तक्रारदाराविरुद्ध आलेल्या तक्रारीसंदर्भात कमकुवत प्रकरण करण्यासाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक रमेश खाडे याने पोलिस शिपाई रवीकुमार आडे याच्यामार्फत तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली होती. या तक्रारीवरुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोन्ही पोलिसांविरुद्ध भंडारा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होणार असल्याची कुणकुण लागताच दोन्ही कर्मचारी फरार झाले. त्यांच्या शोधासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक  त्यांच्या मूळ गावी तसेच चंद्रपूर येथे पाठविण्यात आले होते.

Bribe News
Bhandara Police | पोलिस दलाचा आकृतीबंध ३० वर्षांपूर्वीचा : वाढीव आकृतीबंधाची गरज

परंतु, तिथे त्यांचा शोध लागला नाही. त्यांचे मोबाईल बंद असल्याने त्यांचे लोकेशन मिळण्यास अडचण निर्माण होत आहे. लोकेशन मिळताच त्यांना अटक करण्यात येईल, अशी माहिती लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक प्रविणकुमार पाटील यांनी दिली. तथापि, दोन्ही पोलिसांनी अटकपूर्व जामिन मिळण्यासाठी प्रयत्न चालविले असल्याची माहिती आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news