भंडारा: मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी वैनगंगेत बोट बुडताना बचावली

गोसेखुर्द जलपर्यटन प्रकल्पाचे भूमिपूजन करताना दुर्घटना
Ceremony for Gosekhurd Water Tourism Project
भंडारा येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गोसेखुर्द जलपर्यटन प्रकल्पाचे भूमिपूजन केले. Pudhari News Network
Published on
Updated on

भंडारा: पुढारी वृत्तसेवा : भंडारा येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज (दि. २४) गोसेखुर्द जागतिक दर्जाच्या जलपर्यटन प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी जल पर्यटनाची प्रात्यक्षिके करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जलसफर करण्याची इच्छा व्यक्त केली. हा क्षण टिपण्यासाठी दुसऱ्या बोटीतील सर्व पत्रकार एकदम बोटीच्या पुढील भागात आले. त्यामुळे बोटीचा पुढचा भाग पाण्यात गेला. बोट बुडण्याची भीती निर्माण झाल्याने एकच खळबळ उडाली.

Ceremony for Gosekhurd Water Tourism Project
भंडारा: बेटाळा येथे जि.प.सदस्याची वैद्यकीय अधिकाऱ्याला मारहाण

Summary

  • मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गोसेखुर्द जलपर्यटन प्रकल्पाचे भूमिपूजन

  • मुख्यमंत्र्यांची जलसफर करण्याची इच्छा व्यक्त

  • सर्व पत्रकार बोटीचा पुढील भागात आल्याने बोट पाण्यात

  • रेस्क्यू टीममुळे सर्वजण सुखरूप

Ceremony for Gosekhurd Water Tourism Project
भंडारा : वीज अंगावर पडून शेतकऱ्याचा मृत्यू

बोटीत ८ ते १० पत्रकार

दरम्यान, नाशिक बोट क्लब येथील दोन बोटी आणल्या होत्या. त्यातील एका बोटीमध्ये मुख्यमंत्री शिंदे, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर हे मिळून आठ जण होते. दुसऱ्या बोटीत ८ ते १० पत्रकार होते. बोट सफर करताना मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वत: बोट चालवण्याची इच्छा व्यक्त केली. तो क्षण टिपण्यासाठी दुसऱ्या बोटीतील सर्व पत्रकार एकदम बोटीच्या पुढील भागात आले. सर्व पत्रकारांचे वजन पुढील एका बाजूस झाल्यामुळे बोटीचा पुढचा भाग पाण्यात गेला. बोट बुडण्याची भीती निर्माण झाली होती.

Ceremony for Gosekhurd Water Tourism Project
भंडारा : दोघांकडून सीआरपीएफ जवानाला मारहाण

सुरक्षेसाठी जेटस्कि आणि जिल्हा प्रशासनातर्फे रेस्क्यू टीम

दरम्यान, सुरक्षेसाठी जेटस्कि आणि जिल्हा प्रशासनातर्फे रेस्क्यू टीम तैनात केली होती. ते सर्व काही क्षणात आले आणि पत्रकारांना रेस्क्यू केले. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. तथापि, या घटनेत कोणतीही व्यक्ती पाण्यात पडली नाही. बोटीला कोणतेही नुकसान झालेले नाही. बोट बुडाल्याचे वृत्त चुकीचे असल्याचे एमटीडीसीचे महाव्यवस्थापक डॉ. सारंग कुलकर्णी यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news