Bhandara boat accident | वैनगंगा नदीत बोट उलटली; 2 जण बुडाले, 5 जण बचावले

सात जण नदीच्या मधोमध असलेल्या बेटावर आंघोळ करण्यासाठी गेले असताना ही दुर्घटना घडली
Boat Accident
Boat AccidentBoat Accident
Published on
Updated on

भंडारा : अंघोळीसाठी वैनगंगा नदीत गेलेल्या सात तरुणांपैकी दोघे बुडाले. ही घटना रविवारी रात्री घडली. रविवारी सायंकाळी सुमारे 06.30 वाजता भंडारा तालुक्यातील  करचखेडा येथील वैनगंगा नदीत एका खासगी बोटीने हे तरुण निघाले होते.

Boat Accident
Leopard Attack | बिबट्याचा हैदोस! रामपूर आणि गुढे फाटा परिसरात बिबट्याची दहशत; वयोवृद्धाला 15 मिनिटे घरातच कोंडले

सात जण नदीच्या मधोमध असलेल्या बेटावर आंघोळ करण्यासाठी गेले होते; परतीच्या मार्गावर नदीच्या मध्यभागी बोट अचानक पलटली. यावेळी पवन मुरली चौबे (वय 34, रा. आंबेडकर वार्ड, भंडारा) आणि कृष्णा जगन्नाथ बोकडे (वय 26, रा. चांदणी चौक, भंडारा) हे दोघे नदीमध्ये बुडाले. उर्वरित पाच जण पोहत किनाऱ्यावर परत आले.

Boat Accident
Shahapur Leopard News : शहापुरात पकडलेला बिबट्या तो नरभक्षक बिबट्या नव्हेच?

घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाने जिल्हा शोध व बचाव पथकाला घटनास्थळी तात्काळ रवाना केले आहे. बचावकार्य सुरु असून पुढील तपासणी व शोधकार्य चालू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news