भंडारा : वाहनाच्या धडकेत काळवीटचा मृत्यू

Bhandara News | नेरी-सातोना मार्गावरील रेल्वेफाटकाजवळ घटना
 Accident News |
प्रातिनिधिक छायाचित्रFile photo
Published on
Updated on

भंडारा: पुढारी वृत्तसेवा : मोहाडी तालुक्यातील नेरी-सातोना मार्गावरील रेल्वे फाटकाच्या शेजारी  एका अज्ञात चार चाकी गाडीने काळवीटला धडक दिली. त्यात काळवीटचा जागीच मृत्यू झाला. नेरी रेल्वे फटकाजवळ आज (दि.१८) सकाळी साडेनऊच्या सुमारास काळवीट रस्ता ओलांडत असताना एका वाहनाने जोरदार धडक दिली.

काळवीटच्या डोक्याला व मागच्या पायाला दुखापत झाली. त्यात काळविटीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती  वनपरिक्षेत्र अधिकारी अपेक्षा शेंडे यांना देण्यात आली. त्यांनी वनपरिक्षेत्र कांद्रीच्या बीटरक्षक मनीषा रामटेके, आंधळगावचे क्षेत्र सहाय्यक  एस. के. वैद्य घटनास्थळावर पाठविले. घटनास्थळावरच सातोना येथील  पशुवैद्यकीय अधिकारी कापगते यांनी मृत झालेल्या काळवीटचे शवविच्छेदन केले. शवविच्छेदनानंतर जवळील शेतामध्ये काळवीटला मातीमध्ये पुरून अंत्यविधी करण्यात आली.

 Accident News |
भंडारा: शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकार बेफिकीर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news