Bhandara News : दारुचे व्यसन सोडण्यासाठी हातपाय बांधून लोखंडी पाईपने तरुणाला मारहाण; ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Bhandara News : दारुचे व्यसन सोडण्यासाठी हातपाय बांधून लोखंडी पाईपने तरुणाला मारहाण; ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

भंडारा: पुढारी वृत्तसेवा : दारुचे व्यसन सोडविण्यासाठी व्यसनमुक्ती केंद्रात दाखल झालेल्या एका युवकाचे दोरीने हातपाय बांधून प्लास्टिक आणि लोखंडी पाईपने जबर मारहाण केली. यात तो युवक जखमी झाला. हा गंभीर प्रकार शहरातील अस्तित्व व्यसनमुक्ती केंद्रात घडला. या प्रकरणी सिहोरा पोलिसांनी व्यसनमुक्ती केंद्राच्या चार जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. जिल्ह्यातील अनेक व्यसनमुक्ती केंद्रात अशाच प्रकारच्या घटना घडत असल्याने हे व्यसनमुक्ती केंद्र की छळछावणी? असा प्रश्न उपस्थित होत आहे. Bhandara News

बदलत्या जीवनशैलीमुळे व्यसनाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दारु, सिगारेट, अंमली पदार्थ सहजतेने उपलब्ध होत असल्याने अनेक तरुण याच्या आहारी गेले आहेत. हे व्यसन सोडविण्यासाठी ठिकठिकाणी व्यसनमुक्ती केंद्र उभारण्यात आले आहेत. परंतु, त्यातून बाहेर पडलेल्यांचे व्यसन नक्की सुटते काय? व्यसनमुक्ती केंद्रातून बाहेर आलेले तरुण पुन्हा व्यसनाच्या आहारी जातात, याचे अनेक उदाहरण आहेत. Bhandara News

भंडारा शहरातील अस्तित्व व्यसनमुक्ती केंद्रात दारुच्या आहारी गेलेल्या ईमरान खान युनुस खान पठाण (वय ३६, रा. गडचिरोली)  या तरुणाला दाखल करण्यात आले होते. दरम्यान, केंद्रामधील पियुष ठवरे (वय ३५,  रा. खात रोड, भंडारा)  व अन्य तिघांनी ईमरान खानचे दोन्ही हातपाय दोरीने बांधले. त्यानंतर प्लास्टिक आणि लोखंडी पाईपने त्याच्या संपूर्ण शरिरावर मारहाण केली. यात तो जबर जखमी झाला.

या प्रकरणी भंडारा पोलिसांनी पियुष ठवरेसह अन्य तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक चोपकर करीत आहेत. व्यसनमुक्ती केंद्रात होत असलेल्या या छळाविरुद्ध व्यसनमुक्ती केंद्र संचालकांविरुद्धही कठोर कारवाईची मागणी होत आहे.

हेही वाचा  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news