Bhandara Theft News | आसगाव येथे घरफोडी; १६.६५ लाखांचे सोने-चांदीचे दागिने लंपास

पवनी पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
theft
theftPudhari
Published on
Updated on

Bhandara Gold Jewelry Stolen

भंडारा : पवनी तालुक्यातील आसगाव येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून तब्बल १६ लाख ६५ हजार रुपयांचे सोने-चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पवनी पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रेखा विष्णू भेंडारकर(वय ६१, रा. नेहरू वॉर्ड, आसगाव, ता. पवनी) या कुटुंबासह नागपूर येथे गेल्या असताना दि. २० जुलै ते २२ जुलै दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मुख्य दरवाज्याचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.

theft
Bhandara News | अड्याळ ग्रामपंचायतीत लाखोंचा घोटाळा: सरपंचावर गुन्हा दाखल

घरातील कपाटातील लॉकर फोडून त्यामधील सोन्याचे मंगळसूत्र, बांगड्या, कंठी, अंगठ्या, चैन, कानातील दागिने, नथ, ब्रेसलेट तसेच चांदीचे दागिने असा एकूण १६.६५ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला.

घटनेची माहिती मिळताच पवनी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 331(3), 331(4) व 305(अ) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रवीण डांगे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news