डांभेविरली येथे कर्जबाजारी शेतकऱ्याने जीवन संपविले

शेतीतून पुरेसे उत्पादन न मिळाल्याने नैराश्य
Farmer's  Sucide in bhandara
डांभेविरली येथे कर्जबाजारी शेतकऱ्याने जीवन संपविले. File Photo

भंडारा : पुढारी वृत्तसेवा : मागील वर्षी भाडेतत्वावर केलेल्या शेतीतून पुरेसे उत्पादन न मिळाल्याने कर्जात बुडालेल्या एका शेतकऱ्याने गळफास घेऊन जीवन संपविले. ही घटना लाखांदूर तालुक्यातील डांभेविरली येथे उघडकीस आली. विनोद नकटू ढोरे (वय ४८, रा. डांभेविरली) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

Farmer's  Sucide in bhandara
भंडारा: मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी वैनगंगेत बोट बुडताना बचावली

शेतीतून पुरेसे उत्पादन न मिळाल्याने कर्जबाजारी

याबाबत अधिक माहिती अशी की, विनोद ढोरे यांनी मागील वर्षी एका शेतकऱ्याची ९ एकर शेती पीक उत्पादनासाठी भाडेतत्वावर केली होती. शेतीत विविध पिकांच्या लागवडीसह मशागतीसाठी शेतकऱ्याने काही नागरिकांकडून रक्कम उधार घेतली होती. तर काही बँकांकडून कर्जाची उचल घेतली असल्याचीही माहिती आहे.

दरम्यान, पुरसे उत्पादन न झाल्याने कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत मागील काही दिवसांपासून विनोद होता. याच त्रासातून त्याने स्वत:च्या घरी नायलॉन दोरीने गळफास घेऊन जीवन संपविले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news