

फेसबुकवर मैत्री होवून त्याचे प्रेमात रुपांतर झाल्यानंतर तरुणीला लग्नाचे अमिष दाखवून वांरवांर तिच्यावर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या बरोबरच तिने भेटण्यास नकार देताच संशयित तरुण तिला मारहाण करत होता. या सर्व धक्कादायक प्रकरणानंतर तरुणीच्या तक्रारीवरून युवकाविरूद्ध तुमसर पोलिस ठाण्यात बलात्काराच्या गुन्ह्यासह विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राहुल बिसने (वय.२३ रा. मांगली ता. तुमसर) असे संशयिच आरोपीचे नाव आहे.
काही महिन्याअगोदर पिडित तरुणी व राहूलची फेसबुकवर ओळख झाली होती. सुरूवातीच्या काळात त्यांच्यामध्ये मैत्री होती, त्यानंतर त्याचे रूपांतर प्रेमात झाले. दोघांचे सातत्याने मोबाईलवर बोलणे सुरू झाले. प्रेमाच्या शपथा देत युवकाने पिडीतेला लग्नाचे आमिष दाखवून अनेकदा जबरदस्तीने शारिरिक संबंध ठेवले. तसेच त्याच्या सोबत न भेटल्यास धमकी देवुन तिला थापडबुक्यांनी मारपीट केली. शिवीगाळ करुन जिवाने मारण्याची धमकी देत होता. या घटनेबाबत शनिवारी (दि.२४) आॅगस्ट रोजी पिडित तरुणीने तुमसर पोलिस स्टेशन गाठून तक्रार नोंदविली. पोलिसांनी आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे.