

Externment Order
भंडारा : धार्मिक उत्सवादरम्यान शांतता व सुव्यवस्थ अबाधित राहावी, यासाठी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील १२ सराईत गुन्हेगारांना सहा महिन्यांसाठी जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.
कारधा पोलिस स्टेशन अंतर्गत मानेगाव येथील मयुर चंद्रशेखर मते (२२), पवनी पोलिस स्टेशन अंतर्गत वलनी येथील शुभम राजेंद्र जिभकाटे (२५), निखील प्रभाकर तिघरे, जवाहरनगर पोलिस स्टेशन अंतर्गत दारु विक्री करणारा खैरी/सालेबर्डी येथील श्रीकांत हरिचंद मेश्राम, लोहारा येथील अभिमन्यू निलकंठ उके, सावरी येथील प्रशांत संतोष कांबळे, अड्याळ पोलिस स्टेशन अंतर्गत नवेगाव/ठाणे येथील संतोष लेहनदास लोणारे, भंडारा पोलिस स्टेशन अंतर्गत गणेशपूर येथील अवैध दारु विक्रीचा व्यवसाय करणारे अशोक सुर्यभान खोब्रागडे, शिवाजी वॉर्ड शुक्रवारी येथील विरेंद्र बाबुराव चकोले, भगतसिंग वांर्ड येथील हर्षल उर्फ हर्षपाल संजय पाऊलझगडे, नेहरु वॉर्डातील अभिषेक उर्फ पांग्या रामभाऊ चंदनबटवे, राणी लक्ष्मीबाई वॉर्डातील बाबु उर्फ संकेत सार्वे अशी हद्दपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत.
संबंधित ठाणेप्रभारींनी सदर गुन्हेगारी अभिलेख तयार करुन त्यांचा तडीपारीचा प्रस्ताव पोलिस अधीक्षकांकडे सादर केला. त्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांनी या सराईत गुन्हेगारांना कायद्याच्या कसोटीत बसवून गणपती उत्सव, तसेच येणारे सण, उत्सव शांततेत पार पडावे यासाठी उपविभागीय अधिकाºयांनी सहा महिन्यासाठी हद्दपार केले आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलिस अधीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक नितीनकुमार चिंचोळकर, संबधित ठाणेदार, पोलिस हवालदार राजेश पंचबुद्धे, अंकोश पुराम यांनी केली.