भंडारा: एसटी बसच्या धडकेत तरुण ठार, महिला जखमी

भंडारा: एसटी बसच्या धडकेत तरुण ठार, महिला जखमी

भंडारा: पुढारी वृत्तसेवा : भरधाव एसटी बसने दुचाकीला धडक दिल्याने तरुण जागीच ठार, तर महिला मजूर गंभीर जखमी झाली. ही घटना तुमसर तालुक्यातील खापा लगतच्या विहिरगाव फाट्यावर घडली. शेतात धान रोवणीसाठी जाताना हा अपघात घडला.

योगेश धनराज राखडे (वय २८, रा. खापा, तातुमसर) असे मृताचे नाव आहे. धुरपता व्दारकाप्रसाद हलमारे (वय ४५, राखापा) असे जखमी महिलेचे नाव आहे. शेतात उन्हाळी धानाची रोवणी होती. त्यासाठी तो दुचाकीने शेतात जात होता. त्यावेळी त्याच्या दुचाकीवर मजूर महिलाही शेतात जात होती.

तुमसर आगाराची बस (एमएच ४० एन ८२२२) भंडाऱ्यावरुन तुमसरकडे जात होती. विहिरगाव फाट्यावर समोरुन येणाऱ्या या बसने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीवरील दोघेही खाली पडले. जबर मार लागून योगेशचा जागीच मृत्यू झाला. तर धुरपता गंभीर जखमी झाली. नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमी धुरपतला तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. अपघातात ठार झालेला योगेश हा एकुलता एक मुलगा होता. तो विवाहीत असून मजुरीचे काम करत होता.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news