भंडारा : खवल्या मांजराची विक्री करताना दोघांना अटक; २ खवले मांजर जप्त | पुढारी

भंडारा : खवल्या मांजराची विक्री करताना दोघांना अटक; २ खवले मांजर जप्त

भंडारा; पुढारी वृत्तसेवा: वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ च्या अनुसूची १ मधील अत्यंत दुर्मिळ वन्यप्राणी असलेल्या खवल्या मांजराची विक्री करताना वन विभागाने सापळा रचून दोन आरोपींना अटक केली. ही कारवाई नागपूर आणि भंडारा वन विभागाच्या संयुक्त पथकाने केली आहे. रामेश्वर माणिक मेश्राम ( रा. तिड्डी ता. जि. भंडारा) आणि सचिन श्रावण उके ( रा. खमारी (भोसा) ता. मोहाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याबबातची माहिती अशी की, या भागात खवल्या मांजराची विक्री होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे मंगळवारी (दि.७) सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास पोलिसांनी सापळा रचला. यानंतर रामेश्वर आणि सचिन दोघेजन खवले मांजराची विक्री करण्यास आले होते. यावेळी पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून दोघांना विक्री करताना रंगेहाथ पकडून अटक केली. दोघांकडून १९.९१५ किलोग्रॅम वजनाचे जिवंत नर जातीचे २ खवले मांजर जप्त केली.

ही कारवाई नागपूर वनविभागाचे विभागीय वनाधिकारी (दक्षता) प्रितमसिंह कोडापे यांच्या नेतृत्वाखाली बुटीबोरीचे वनपरिक्षेत्राधिकारी प्रमोद वाडे, भंडाराचे वनपरिक्षेत्राधिकारी विवेक राजूरकर, आय. एम. सैय्यद, संदिप धुर्वे, दिनेश शेंडे, योगेश ताळाम, दिनेश पवार, एन. जी. श्रीरामे, अनिल शेळके, राजु वानखेडे यांनी संयुक्तरित्या केली.

या प्रकरणाचा पुढील तपास मुख्य वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे, भंडाराचे उपवनसंरक्षक राहुल गवई यांच्या मार्गदर्शनात सहायक वनसंरक्षक साकेत शेंडे, वनपरिक्षेत्राधिकारी विवेक राजूरकर, फिरते पथकाचे वनपरिक्षेत्राधिकारी संजय मेंढे करीत आहेत.

हेही वाचा : 

Back to top button