भंडारा : दुचाकी झाडावर आदळून अपघात; पत्‍नी, सासू ठार

भंडारा : दुचाकी झाडावर आदळून अपघात; पत्‍नी, सासू ठार
Published on
Updated on

भंडारा ; पुढारी वृत्‍तसेवा 

भरधाव दुचाकी अनियंत्रित झाल्याने झाडावर आदळली. या अपघातात दुचाकीचालकाची पत्नी आणि आजेसासू ठार झाले, तर दुचाकीचालक जखमी झाला. ही घटना (शुक्रवार) शिवणीबांध मार्गावर घडली. मीनाक्षी विनोद किरणापूरे आणि सुंदरा बळीराम बोरकर (वय ७०) अशी मृतांची नावे आहेत.

विनोद प्रभू किरणापूरे (३०) रा़लवारी हा दुचाकीने पत्नी मीनाक्षी आणि आजेसासू सुंदरा यांना बसवून सानगडीकडून साकोलीकडे जात होता़. शिवनीबांधजवळ दुचाकी अनियंत्रीत झाल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर दुचाकी आदळली़. यात मीनाक्षी किरणापूरे आणि सुंदरा बोरकर यांचा मृत्यू झाला. तर विनोद किरणापूरे जखमी झाला.

या प्रकरणी साकोली पोलिसांनी दुचाकीचालक विनोद किरणापूरेविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक खोब्रागडे करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news