भंडारा : पत्रकारावर हल्ला करणाऱ्यांवर गुन्हे दाखल

भंडारा : पत्रकारावर हल्ला करणाऱ्यांवर गुन्हे दाखल
Published on
Updated on

भंडारा, पुढारी वृत्तसेवा : कोविड काळात बियर बारवर झालेल्या कारवाईची बातमी का लावली?, असे म्हणत बियर बारचालकाने पत्रकारावर हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणी दोघांवर प्रसारमाध्यम संस्था हिंसक कृत्य प्रतिबंध अधिनियम तथा भादंविच्या कलमान्वये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. प्रतीक वामनराव तांबोळी (४३ रा. भंडारा) या पत्रकारावर हल्ला करण्यात आला होता. कोविड काळात भंडारा येथील कंबोज बियर बारविरुद्ध उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली होती. त्या कारवाईची बातमी तांबोळी यांनी प्रकाशित केली होती.

दरम्यान, १३ जुलैच्या रात्री ११.३० वाजताच्या सुमारास प्रतीक तांबोळी हे राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला आपल्या मित्राची वाट बघत असताना बियर बारचालक संजय कंबोज याचा पुतण्या हा जवळ आला. व तांबोळी यांना बघून कोविड काळात आमच्या बारवर झालेल्या कारवाईची बातमी का लावली?, असे बोलुन मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली.

प्रतीक तांबोळी यांच्या तक्रारीवरुन भंडारा पोलिसांनी संजय कंबोज व त्याचा पुतण्या (२८) या दोघांविरुद्ध भादंविच्या कलम ३२३, ५०४, ५०६, ३४ सहकलम ४ प्रसार माध्यम संस्था हिंसक कृत्य मालमत्तेचे नुकसान किंवा हानी यांना प्रतिबंधक अधिनियम २०१७ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक गणेश पडवार करीत आहेत.

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news