वाशिम : धावत्या कंटेनरमध्ये शिरून सिनेस्टाईल चोरीचा प्रयत्न उधळला

वाशिम : धावत्या कंटेनरमध्ये शिरून सिनेस्टाईल चोरीचा प्रयत्न उधळला
Published on
Updated on

वाशिम : पुढारी वृत्तसेवा : धावत्या कंटेनरचे कुलूप तोडून सिने स्टाईल माल लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना आज (दि.१३) पहाटे चार वाजता औरंगाबाद- नागपूर महामार्गावरील किन्हीराजा बसस्थानकावर घडली.

याबाबत अधिक माहिती अशी, मुंबईवरुन (एम एच १३ ए एक्स ८११९) हा कंटेनर माल घेऊन नागपूरकडे जात होता. आज पहाटे चार वाजता जऊळका येथील रेल्वे पटरी ओलांडताच धावत्या कंटेनरचे मागील बाजूचे कुलूप चोरट्यांनी तोडत कंटेनरमध्ये प्रवेश केला. चोरटे कंटेनरमध्ये शिरल्याचे समजताच चालकाने किन्हीराजा बस स्थानकाजवळील पंक्चरच्या दुकानाजवळ कंटेनर थांबवला. त्यानंतर चोरट्यांनी कंटेनरमधून उड्या मारून दुचाकीवरून पळ काढला . चालकाने या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

हेही वाचा :  

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news