Amravati News | शेतात विजेचा धक्का लागून महिला मजुराचा मृत्यू ; महावितरणविरोधात नागरिकांचा आक्रोश

Woman Labourer Death | अंजनगाव सुर्जी तालुक्यातील दहिगांव रेचा येथील घटना
electric shock in field
महिला मजुराच्या मृत्यूनंतर महावितरण कार्यालयासमोर नागरिकांनी गर्दी केली होती. (Pudhari Photo)
Published on
Updated on

Woman Labourer Death Electric Shock in Field

अमरावती : शेतात काम करताना विजेचा जोरदार धक्का लागल्याने महिला मजुराचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि. २५) अंजनगाव सुर्जी तालुक्यातील दहिगांव रेचा शेतशिवारात उघडकीस आली. या घटनेनंतर नागरिकांनी महावितरण विरोधात आक्रोश व्यक्त केला. रूपाली शुद्धोधन सावळे (वय ३०) असे मृत महिलेचे नाव आहे. गावातील नागरिक व मजूर दोषींवर कारवाईच्या मागणीसाठी महावितरण कार्यालयावर धडकल्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

याबाबत अधिक माहिती अशी की, दहिगाव रेचा येथील अनिल धुमाळे यांच्या शेतात गावातील दहा महिला मजूर निंदणासाठी आल्या होत्या. सर्व मजूर शेतामध्ये काम करत होते. त्यावेळी अचानक विजेचे तार तुटून शेतात पडले. या तारांचा स्पर्श रूपाली शुद्धोधन सावळे यांना झाला आणि त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. सोबत काम करणार्‍या महिला हे पाहून घाबरल्या.त्यांनी तत्काळ घटनेची माहिती शेत मालक आणि गावातील नागरिकांना दिली.

electric shock in field
Amaravati Crime News | अमरावती पाण्याच्या ड्रममध्ये आढळला महिलेचा मृतदेह

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस तिथे पोहोचले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्टमसाठी ट्रॅक्टरमध्ये टाकून अंजनगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवला. या घटनेनंतर नागरिकांनी महावितरण विरोधात आक्रोश व्यक्त केला. पोलिसांनी मध्यस्थी करून या प्रकरणी जबाबदार महावितरण अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यावर नागरिक शांत झाले. रूपाली सावळे यांच्या मागे ९ वर्षाचा एक मुलगा आणि ७ वर्षाची एक मुलगी असा आप्त परिवार आहे. त्यांच्या अकस्मात जाण्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

electric shock in field
Amravati News : 22 वर्षीय महिला कुस्तीपटूचा हार्ट ॲटॅकने मृत्यू! प्राप्ती विघ्नेचा जाण्याने अमरावती क्रीडा क्ष्रेत्रावर शोककळा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news