Navneet Rana| अमरावतीतून नवनीत राणा पिछाडीवर

Navneet Rana| अमरावतीतून नवनीत राणा पिछाडीवर

पुढारी ऑनलाईन डेस्क: महाराष्ट्रातील अमरावती लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार नवनीत राणा  (Navneet Rana) पिछाडीवर आहेत. राणांना आतापर्यंत 5408 मते  मिळाले आहेत. तर कांग्रेसचे बळवंत खाडे  9852 मते मिळवत आघाडीवर आहेत. तर प्रहारचे उमेदवार दिनेश बूब यांना 1055 मते मिळाली आहेत.

अमरावती लोकसभेच्या पहिल्या राऊंड मध्ये महाविकास आघाडी चे उमेदवार बळवंत वानखडे आघाडी वर आहेत.  तिवसा, बडनेरा, अमरावती,मेळघाट मध्ये महाविकास आघाडी चे उमेदवार बळवंत वानखडे आघाडीवर आहेत. आमदार रवी राणा यांच्या मतदारसंघात देखील नवनीत राणा पिछाडीवर पडले आहेत. तर बच्चू कडू यांच्या अचलपूर मतदार संघात नवनीत राणा आघाडीवर आहेत.

अमरावती लोकसभा मतदारसंघात विधानसभेच्या एकूण सहा जागा आहेत. येथे सर्वाधिक महिला उमेदवार निवडून आल्या आहेत. 1980 मध्ये काँग्रेसच्या उषा चौधरी पहिल्यांदा विजयी झाल्या होत्या. 1991 मध्ये काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा पाटील यांनी ही जागा जिंकली आणि नंतर त्या भारताच्या राष्ट्रपती झाल्या.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news