बळजबरीने अल्पवयीन मुलीवर अत्याचार; तरुणावर गुन्हा दाखल

Amravati News | खोलापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना
A minor girl has been abused
खोलापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला. File Photo
Published on
Updated on

अमरावती, पुढारी वृत्तसेवा: जिल्ह्यातील भातकुली तालुक्यात येणाऱ्या खोलापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १५ वर्षे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ही घटना बुधवारी (दि. २) पहाटे २ ते ५ च्या सुमारास घडली. अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी २५ वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी बुधवारी झोपली होती. दरम्यान, पहाटे दोन वाजता तरुणाने घराचा दरवाजा ठोठावला. त्यामुळे ती झोपेतून उठली. त्यानंतर तिने दार उघडले असता परिचयातील असलेला तरुण तेथे उभा असल्याचे दिसले. त्याने तिला सोबत येण्याचा आग्रह केला. मात्र, अल्पवयीन मुलीने नकार दिल्याने आरोपी तरुणाने तिचा हात धरला. त्यामुळे अल्पवयीन मुलीने वडिलांना आवाज दिला. परंतु, मुलीच्या घरातील कुलर आणि पंखा सुरू असल्याने वडिलांना तिचा आवाज ऐकू आला नाही. त्यानंतर आरोपीने अल्पवयीन मुलीला बळजबरीने नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

या घटनेनंतर अल्पवयीन मुलीने सर्व हकीकत वडिलांना सांगितली. त्यानंतर अल्पवयीन मुलीने खोलापूर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम ६४, ६५, १२७ (२), पोक्सो अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

A minor girl has been abused
Earthquake : अमरावती जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के, चिखलदरा तालुक्यात केंद्रबिंदू

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news