

अमरावती, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील पांढरी खानमपूर येथील कमानीचा वाद चिघळला आहे. गावातील प्रवेशद्वाराला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी गेल्या पाच दिवसापासून विभागीय आयुक्त कार्यालयावर गावातील आंबेडकरी समाजाचे ग्रामस्थ आंदोलनाला बसले होते. या दरम्यान आज (दि.११) काही आंदोलक आक्रमक होऊन त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. तसेच काहीजण विभागीय आयुक्त कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे पोलिसांनी जमावावर लाठी चार्ज करून अश्रूधूराच्या नळकांड्या फोडल्या. संतप्त जमावाने पोलिसांच्या वाहनांवर देखील दगडफेक केली. त्यामुळे पाच ते सात पोलीस कर्मचारी जखमी झाले. त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा