Amravati Crime | अमरावती हादरले! ६ वर्षांच्या चिमुकलीवर शाळेच्या परिसरात अत्याचार; ५६ वर्षीय आरोपीला अटक

चांदूरबाजार तालुक्यात शिरजगाव बंड येथील घटनेने खळबळ
Girl assault case
Girl assault casePudhari
Published on
Updated on

Chandurbazar girl assault case

अमरावती : जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यात शिरजगाव बंड येथील सहा वर्षांच्या चिमुरडीवर ५५ वर्षीय विकृताने अत्याचार केल्याची संतापजनक घटना २ डिसेंबर रोजी घडली. ही धक्कादायक घटना शाळेच्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात स्पष्टपणे कैद झाली असून पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी राजू मुल्ला उर्फ रियाजुद्दीन जहिरुद्दीन मुल्ला (वय ५६, रा. शिरजगाव बंड ) याने आपल्या घराशेजारी राहणार्‍या चिमुरडीला बिस्किट देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी वीस रुपये देऊन तिला विश्वासात घेतले आणि जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. शाळा परिसरात शांतता असल्याचा फायदा घेत हा घृणास्पद प्रकार घडवून आणल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट झाले आहे.

Girl assault case
Amravati Teachers MLC | अमरावती विभाग शिक्षक विधान परिषदेसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

घटना समोर आल्यानंतर मुलीच्या आईने दि. ३ डिसेंबर रोजी चांदूरबाजार पोलीस स्टेशन गाठून आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करत बीएनएस कलम ६४ (१), ६५ (२) सह पोक्सो कलम ४, ६, १२ कायद्यान्वये आरोपीला अटक केली. ठाणेदार अशोक जाधव, पोलीस उपनिरीक्षक विनोद इंगळे यांचा मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

आरोपीवर कठोर गुन्हे दाखल करण्यासाठी पीडित मुलीचे नातेवाईकांसह शहरातील नागरिकांनी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचून मागणी केली होती. यामुळे पोलीस स्टेशन परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Girl assault case
Amravati Municipal Elections | अमरावती जिल्ह्यात १ नगराध्यक्ष, ५ नगरपरिषदेतील आठ सदस्यांच्या निवडणुकीला स्थगिती

मालेगावसारख्या प्रकरणानंतर राज्यभर संतापाची लाट उसळलेली असताना अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजारातील ही घटना समाजमनाला पुन्हा एकदा हादरवून सोडणारी आहे. अल्पवयीनांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांमुळे कठोरात कठोर कायदा बनवून त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याची मागणी अधिक तीव्र होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news