Amravati crime | पाण्याच्या टाकीत सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा; पत्नीसह प्रियकर जेरबंद

डीएनए चाचणी, सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाच्या आधारे तपास
Murder Case
Murder CasePudhari
Published on
Updated on

अमरावती : सुमारे दीड महिन्यांपासून गूढ बनलेल्या खून प्रकरणाचा अखेर अमरावती शहर गुन्हे शाखेने छडा लावत मृत व्यक्तीची ओळख पटवून पत्नी व तिच्या साथीदाराला अटक केली आहे. बंद दवाखान्याच्या छतावरील पाण्याच्या टाकीत सडलेल्या अवस्थेत आढळलेल्या मृतदेहामागे अनैतिक संबंधातून घडलेला खून असल्याचे तपासात समोर आले आहे.

नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वजीर पटेल यांच्या बंद दवाखान्याच्या छतावरील पाण्याच्या टाकीत १३ मे २०२६ रोजी एका अनोळखी पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाची अवस्था अत्यंत खराब असल्याने ओळख पटविणे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरले होते. याप्रकरणी नागपुरी गेट पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता.

Murder Case
Amravati crime तपोवन जंगलातील तरुणीच्या हत्येचा उलगडा; ओळख लपवण्यासाठी मृतदेह पेटवला

दरम्यान, गुन्हे शाखा आणि नागपुरी गेट पोलिसांनी शहर व ग्रामीण भागातील बेपत्ता व्यक्तींची माहिती गोळा केली. तपासादरम्यान ३१ मार्च २०२६ रोजी बेपत्ता झालेल्या अब्दुल रियाज अब्दुल अनीस (रा. अलीम नगर, अमरावती) याच्याबाबत संशय निर्माण झाला. त्यानंतर करण्यात आलेल्या डीएनए चाचणीत पाण्याच्या टाकीत सापडलेला मृतदेह अब्दुल रियाजचाच असल्याचे निष्पन्न झाले. मात्र मृतदेहाची ओळख पटल्यावरही आरोपींचा कोणताही ठोस सुगावा पोलिसांच्या हाती लागत नव्हता. अशा परिस्थितीत गुन्हे शाखेने गुप्त माहितीदारांचे जाळे, सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि इतर तांत्रिक पुराव्यांचा आधार घेत तपासाची चक्रे वेगाने फिरवली.

तपासात धक्कादायक माहिती समोर आली. मृतकाची पत्नी नसरीन बानो हिने तिचा साथीदार शेख ईकराम शेख चांद याच्या मदतीने कट रचल्याचे उघड झाले. दोघांनी अब्दुल रियाज याला त्याच्या वडिलांच्या घरातून बोलावून घेतले. त्यानंतर त्याचा खून करून मृतदेह ऑटो रिक्षामधून नेऊन वजीर पटेल यांच्या बंद दवाखान्याच्या छतावरील पाण्याच्या टाकीत फेकल्याची कबुली आरोपींनी दिली.

Murder Case
Panvel Crime News: विवाहासाठी तगादा लावणाऱ्या प्रेयसीचा खून; मृतदेह जाळून पुरावा नष्ट करणारा प्रियकर अटकेत

अटक आरोपीमध्ये शेख ईकराम शेख चांद (वय २७, व्यवसाय–चालक, रा. सहारा नगर, अमरावती) व नसरीन बानो अब्दुल रियाज (वय ३७, रा. अलकरीम नगर क्रमांक २, अमरावती) यांचा समावेश आहे. या प्रकरणातील दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी नागपुरी गेट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. प्रत्यक्ष साक्षीदार नसताना आणि मृतदेहाची ओळखही अस्पष्ट असताना केवळ डीएनए अहवाल, सीसीटीव्ही फुटेज, गुप्त माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्ह्याची उकल करण्यात गुन्हे शाखेला यश आले.

त्यामुळे शहरातील अलीकडील काळातील सर्वाधिक क्लिष्ट आणि आव्हानात्मक खून प्रकरणांपैकी एकाचा छडा लागल्याची चर्चा पोलीस वर्तुळात सुरू आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपआयुक्त यशवंत सोळंके, रमेश धुमाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजी बचाटे व कैलास फुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा आणि सायबर पोलिसांच्या संयुक्त पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news