Amravati Crime | घरगुती वादातून उचलले टोकाचे पाऊल; पोटच्या मुलानेच घेतला वडिलांचा जीव

अमरावती शहर गुन्हे शाखा आणि वलगाव पोलिसांनी खुनाचा उलगडा करत आरोपीला केली अटक
Crime News
Crime Newsfile photo
Published on
Updated on

son kills father Amravati

अमरावती: कौटुंबिक वाद आणि सततच्या छळामुळे संतप्त झालेल्या मुलाने स्वतःच्या वडिलांचाच जीव घेतल्याची धक्कादायक घटना वलगाव पोलीस स्टेशन हद्दीतील रेवसा येथे उघडकीस आली आहे. अमरावती शहर गुन्हे शाखा आणि वलगाव पोलिसांनी या खुनाचा उलगडा करून आरोपीला अटक केली.

१३ एप्रिलरोजी पहाटे रेवसा गावात खुनाची माहिती नियंत्रण कक्षाला मिळताच पोलीस यंत्रणा तात्काळ सतर्क झाली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली. मृत व्यक्तीची ओळख जनार्दन श्रीरामजी केवदे (वय ५२) अशी पटली.

Crime News
Amravati crime news | कपिलवस्तु नगरात तरुणाचा खून 

प्राथमिक चौकशीत पोलिसांनी मृतकाची पत्नी रेखा केवदे आणि मुलगा धीरज केवदे यांची विचारपूस केली. यावेळी धीरजच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

धीरजने दिलेल्या माहितीनुसार, त्याचे वडील जनार्दन केवदे हे दारू आणि गांजाचे व्यसनाधीन होते. नशेत घरी येऊन ते पत्नी व मुलाला वारंवार शिवीगाळ व मारहाण करीत असत. या सततच्या त्रासाला कंटाळून १३ एप्रिलच्या पहाटे सुमारे १.३० वाजता रागाच्या भरात धीरजने घरासमोरील जोत्यावर लाकडी टेम्प्याने वडिलांच्या डोक्यावर वार केला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी आरोपी धीरज जनार्दन केवदे (वय १९) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील तपास वलगाव पोलीस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news