Amravati Transgender Groups Clash
Amravati Transgender Groups ClashPudhari

Amravati Crime | अमरावतीत तृतीयपंथीयांच्या दोन गटांत सशस्त्र हाणामारी; तीन गंभीर जखमी

अमरावती शहरातील शेगाव नाका परिसरात आशियाड कॉलनीमध्ये घटना
Published on

Amravati Transgender Groups Clash

अमरावती : अमरावती शहरातील शेगाव नाका परिसरात आशियाड कॉलनीमध्ये आज (दि.२७) दुपारी तृतीयपंथीयांच्या दोन गटांमध्ये जुन्या वादातून तुफान हाणामारी झाली. या सशस्त्र संघर्षात चाकू आणि तलवारींचा वापर करण्यात आला असून, यात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तृतीयपंथीयांच्या दोन गटांमध्ये गेल्या काही दिवसांपासून जुना वाद सुरू होता. आज २७ जानेवारी रोजी दुपारी या वादाने रौद्र रूप धारण केले. आशियाड चौकात दोन्ही गट आमनेसामने आले आणि त्यांच्यात जोरदार हाणामारी सुरू झाली. बघता बघता या वादात धारदार शस्त्रांचा वापर करण्यात आला.

Amravati Transgender Groups Clash
Amravati Crime | स्वयंपाक बनवण्यावरून दारूच्या नशेत राफ्टर डोक्यात घालून मित्राचा खून

या हल्ल्यातील तिघांना जखमी अवस्थेत तातडीने उपचारासाठी अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्लेखोरांनी चाकू आणि तलवारीने जीवघेणा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच गाडगे नगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सध्या 'आम्रपाली गट' गाडगे नगर पोलीस ठाण्यात जमा झाला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. भरदिवसा झालेल्या या सशस्त्र हल्ल्यामुळे आशियाड कॉलनी आणि शेगाव नाका परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news