Amravati Murder : पैशाच्या वादातून उत्सव मेळ्यात पश्चिम बंगालच्या व्यापार्‍याची हत्या! 

सायन्स कोर मैदानावर घटना; एका आरोपीला अटक
Amravati Murder
Amravati Murder
Published on
Updated on

अमरावती : शहरातील सायन्स कोर मैदानावर सुरू असलेल्या ‘उत्सव मेळ्या’त शुक्रवारी रात्री पैशांच्या व्यवहारातून झालेल्या वादाचे पर्यावसान हत्येत झाले. पश्चिम बंगालमधील वर्धमान येथील ५३ वर्षीय व्यापारी अभिजीत सुकुमार कर यांची हत्या करण्यात आली. उत्सव मेळ्यातील अंतर्गत वादातून आरोपीने व्यापार्‍याच्या पोटात चाकूने सपासप वार केले. या घटनेनंतर शनिवारी (दि.९) हिंदुत्ववादी संघटनांनी उर्वरित आरोपींच्या अटकेची मागणी केली. पोलिसांनी याप्रकरणी मुख्य आरोपीला जेरबंद केले असून सुरक्षिततेचा उपाय म्हणून सध्या हा उत्सव मेळा सील करण्यात आला आहे.

सायन्स कोर मैदान परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त सुरक्षेच्या दृष्टीने लावण्यात आला. अभिजीत सुकुमार कर (वय ५३, वर्धमान, पश्चिम बंगाल) असे मृतक व्यापार्‍याचे नाव आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी अजीज खान युसुफ खान (वय ३८, रतनगंज) याला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून उत्सव मेळयाला सील केले आहे.

तक्रारदार तमरेज आलम मोहम्मद इक्बाल (रूडकी, पश्चिम बंगाल) यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्सव मेळयामध्ये त्यांनी झोके लावले आहे. गुरुवारी रात्री ते मजुरांसोबत तेथेच होते. त्यावेळी आरोपी अजिज खान तिथे आला, त्याने व्यापारी अभिजीत कर यांना शिवीगाळ केली. वाद वाढल्याने आरोपीने कमरेमधील चाकू काढून अभिजीत कर यांच्या पोटात सपासप वार केले. या हल्ल्यात अभिजीत गंभीर जखमी झाले, तिथे उपस्थित मजुरांनी त्यांना तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल केले. जिथे उपचारादरम्यान शुक्रवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेतले. घटनेनंतर शनिवारी सायन्स कोर मैदान परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला. 

माहिती नुसार पैशाच्या हिशोबावरून वाद झाला होता. आधी उत्सव मेळयाची परवानगी नागपूर येथील कुंदन लाखीना यांना देण्यात आली होती. नंतर दुसर्‍या महिन्यात अमरावती येथील रहिम यांना देण्यात आली. सुरुवातीला आयोजकांमध्ये कुंदन लाखीना,त्यांची पत्नी पारुला आणि मृतक अभिजीत कर सहभागी होते. यानंतर रहीम खान सोबत त्यांनी सामंज्यस्याची भूमिका घेतली. आरोपी अजित खान यानेही उत्सव मेळयामध्ये पैसे गुंतवले होते आणि तो आर्थिक लाभ घेत होता. पैशांच्या हिशोबावरून झालेल्या वादात ही घटना घडली.पुढील तपास पोलिस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news