

Amravati Voting Updates
अमरावती: अमरावती महापालिकेच्या 22 प्रभागातील 87 जागेसाठी गुरुवारी (दि.15) सकाळी साडेसात वाजता पासून शांततेत मतदान सुरू झाले. सकाळी साडेनऊ वाजता पर्यंत पहिल्या टप्प्यात सातही झोनमध्ये सात टक्के सरासरी मतदानाची नोंद झाली.
सकाळच्या टप्प्यात मतदारांचा उत्साह दिसून आला नाही मात्र साडेनऊ वाजता नंतर मतदान केंद्राबाहेर रांगा लागायला सुरुवात झाली होती. ईव्हीएम मधील तांत्रिक बिघाड व किरकोळ घटना वगळता सर्वत्र शांततेत मतदान सुरू आहे.
दरम्यान गाडगे नगरातील प्रगती विद्यालयात ईव्हीएम मशीन मध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे यांना मतदानासाठी ताटळत रहावे लागले. त्यांनी या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली. यासह काह प्रभागांमध्ये मतदारांची नावे आढळून आल्याने त्यांनीही नाराजी व्यक्त केली.