

अमरावती : अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या नामांकनाच्या शेवटच्या दिवशी ८७ जागेसाठी ८३३ उमेदवार मैदानात होते. मात्र नामांकन वापस घेतल्यानंतर आता मनपा रणसंग्रामात ६६१ उमेदवार रिंगणात आहे.
शनिवारपासूनच प्रचाराने जोर पकडला आहे. महापालिका प्रशासनाने २२ ही प्रभागातील उमेदवारांना ७ झोन मध्ये नामांकन दाखल करण्याची व्यवस्था आणि परत घेण्याची व्यवस्था केली होती. शुक्रवार २ जानेवारी रोजी झोन क्रमांक १ रामपुरी कॅम्प येथून १८ उमेदवारांनी माघार घेतली. यामध्ये शेगाव रहाटगांव मधून प्रियंका वानखडे, अभिषेक बोले ,गोपाल धर्माळे, सुनील केने, आशिष कावरे, प्रेमा लव्हाळे, राहुल सावले, दिनेश धाकडे यांचा सहभाग आहे. प्रभाग २ गाडगेबाबा पीडीएमसीमधून विजय आठवले, नरेंद्र गुलदेवकर, प्रमिला जाधव ,संजय कडू व प्रभाग ५ महेंद्र कॉलनी कॉटन मार्केटमधून रवी गायगोले, संजय भोवते, मेघा काळे, वैशाली पावडे, आयेशा खान आसिफ खान, वनिता जाधव यांनी नामांकन परत घेतले.
झोन २ तहसील कार्यालय येथून १२९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. २९ उमेदवारांनी येथून नामांकन परत घेतले. झोन-३ राजापेठमध्ये १२२ उमेदवारांनी नामांकन भरले होते. छाननी दरम्यान २ नामांकन बाद झाले आणि २६ उमेदवारांनी माघार घेतली. झोन-४ दस्तूर नगरमध्ये १२९ उमेदवारांमधून २१ उमेदवारांनी माघार घेतली. झोन ५ मनपा शिक्षण विभाग येथून २७ उमेदवारांनी नामांकन परत घेतले. झोन ६ जुनी तहसील येथून १४ उमेदवार आणि झोन ७ बनडेरा मधून २१ उमेदवारांनी माघार घेतली. यामुळे आता निवडणुक रिंगणात ६६१ उमेदवार उरले आहे. या उमेदवारांमध्ये आता लढत होणार आहे.
उमेदवारांची झोन निहाय संख्या
झोन १ - ९७
झोन २ - १००
झोन ३ - ९४
झोन ४- १०८
झोन ५ - ८३
झोन ६ - ५३
झोन ७ - १२६
एकूण- ६६१