

Daryapur Akola road accident
अमरावती : दर्यापूर-अकोला मार्गावरील लासूर जवळील एका पोल्ट्री फॉर्म जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत अकोला जुन्या शहरातील २७ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि.५) रात्री आठ वाजताच्या सुमारास घडली. श्रीकांत प्रभाकर बावनेर (रा. भांडपूरा चौक, जुने शहर अकोला) असे मृत युवकाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, श्रीकांत बावनेर हा बुलेटवरून (एमएच ३०,बी झेड ८९५६) अकोल्याकडे जात होता. दरम्यान लासूर जवळील एका पोल्ट्री फॉर्म जवळच्या कॉर्नरवर अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली. या धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाला.
ज्या ठिकाणी अपघात झाला ते अपघात प्रणव स्थळ आहे. दर्यापूर व अकोलाकडून येणारी वाहने येथून भरधाव वेगाने धावतात. त्यामुळे या ठिकाणी दोन्ही बाजूला गतिरोधक बसविण्याची गरज आहे. घटनेचा पुढील तपास येवदा पोलीस करीत आहेत.