Amravati Bribe | दर्यापूर येथे ३० हजारांची लाच घेताना ग्रामविकास अधिकाऱ्यासह तिघे 'एसीबी'च्या जाळ्यात

जनसुविधा योजनेतील सिमेंट काँक्रीट रस्त्याचे प्रलंबित बिल मंजूर करून देण्यासाठी मागितली लाच
Bribery Case
Bribery Case Pudhari
Published on
Updated on

Daryapur Bribery Case

अमरावती : जनसुविधा योजनेतील सिमेंट काँक्रीट रस्त्याचे प्रलंबित बिल मंजूर करून देण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना ग्रामविकास अधिका-यासह तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी (दि.२५) रंगेहात पकडले. ही कारवाई दर्यापूर येथे करण्यात आली.

या प्रकरणातील आरोपींमध्ये ग्रामपंचायत अधिकारी गोपाल देविदास चारथळ (वय ५०, रा.प्रसाद कॉलनी, अमरावती), ग्रामपंचायत सदस्य पद्माकर साहेबराव राऊत (वय ५२, रा. कान्होली, दर्यापूर) आणि खाजगी व्यक्ती मोतीराम गोंडुजी कोल्हे (वय ६८, रा.अशोकनगर, दर्यापूर) यांचा समावेश आहे.

Bribery Case
Amravati Murder : भारवाडी हत्याकांडाचा राजकोट कनेक्शनसह उगलडा; जुन्या वैमनस्यातून मित्रांनीच रचला होता खुनाचा कट

तक्रारदाराने ग्रामपंचायत कानोली अंतर्गत जनसुविधा २०२०-२५ योजनेत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम पूर्ण केले होते. एकूण ८ लाखांच्या बिलापैकी सुमारे ३ लाख ८० हजार रुपये अदा झाले होते; उर्वरित ४ लाख २० हजार रुपये मंजूर करून देण्यासाठी आरोपींनी ४० हजार रुपयांची मागणी केल्याची तक्रार १७ फेब्रुवारी रोजी एसीबीकडे करण्यात आली.

पडताळणीत ३० हजार रुपयांवर सौदा ठरल्याचे निष्पन्न झाले. यानुसार २५ फेब्रुवारीरोजी दर्यापूर येथील झेरॉक्स सेंटरजवळ सापळा रचण्यात आला. आरोपींनी ३० हजार रुपये स्वीकारताच पथकाने कारवाई करून त्यांना ताब्यात घेतले. जप्त रकमेमध्ये ५०० रुपयांच्या नोटांचा समावेश आहे. या प्रकरणी दर्यापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 

Bribery Case
Amravati Missing Girl | अमरावतीतील अल्पवयीन मुलगी तमिळनाडूत सापडली, आईशी वादामुळे सोडले होते घर

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली. दरम्यान, शासकीय अधिकारी किंवा कर्मचार्‍यांकडून लाच मागितल्यास नागरिकांनी त्वरित लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागातर्फे करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news