Amravati Black Magic | मृतदेहाला तांत्रिक क्रियेद्वारे जिवंत करण्यासाठी स्मशानभूमीत अघोरी पूजा? पाच जणांना अटक

ब्राह्मणवाडा थडी येथील दफन केलेल्या मृतदेहाच्या स्थळाजवळ पूजा साहित्य आढळले
Brahmanwada Crematorium Black Magic Incident
ब्राह्मणवाडा थडी पोलिसांनी तत्पर कारवाई करत पाच जणांना ताब्यात घेतले. Pudhari
Published on
Updated on

Brahmanwada Crematorium Black Magic Incident

अमरावती : दफन केलेल्या मृतदेहाला तंत्र-मंत्राच्या माध्यमातून स्मशानभूमीत अघोरी पूजा केल्याचा धक्कादायक प्रकार ब्राह्मणवाडा थडी येथे उघडकीस आला. या प्रकरणी ब्राह्मणवाडा थडी पोलिसांनी तत्पर कारवाई करत पाच जणांना ताब्यात घेतले. निलेश मनोहरराव सोनटक्के (वय ३४, संतोषीनगर, अमरावती), सुबोध प्रकाश भोयर (वय ३०, उदखेड, अमरावती), आशुतोष महादेव तायडे (वय ३०, कौलखेडा, अकोला), साहेबराव पांडुरंग गायकवाड (वय ५६, ठाणे/पुणे) आणि चंदू गणेशलाल गुप्ता (वय ४३, ब्राह्मणवाडा थडी, ता. चांदूर बाजार) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

ब्राह्मणवाडा थडी येथील महेंद्र राजू गवळी (वय २७) यांचे निधन झाल्यानंतर १५ सप्टेंबर रोजी दुपारी स्थानिक हिंदू स्मशानभूमीत त्यांच्या मृतदेहाचे दफन करण्यात आले. दरम्यान, १६ सप्टेंबर रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास मृताच्या चुलत भावाला स्मशानभूमीत काही अज्ञात व्यक्ती पूजा-पाठ करीत असल्याची माहिती मिळाली.

Brahmanwada Crematorium Black Magic Incident
Amravati News : मृत्यूच्या दारातही उजळला मानवतेचा दीप; 'ब्रेन डेड' धीरजच्या अवयवदानामुळे तिघांना जीवनदान

मृताच्या नातेवाइकांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता कबरीजवळ तंबाखू, अगरबत्ती, माचिस, फुटाणे, इत्राची छोटी बाटली आणि काळी टोपी यासह काही पूजा साहित्य आढळून आले. स्मशानभूमीच्या भिंतीलगत एमएच ०३/सीएच २६६५ क्रमांकाची कारही उभी असल्याचे आढळले. मृतदेहाला तांत्रिक क्रियेद्वारे जिवंत करण्याच्या उद्देशाने हा प्रकार करण्यात आल्याचा संशय तक्रारीत व्यक्त करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच ब्राह्मणवाडा थडी पोलिसांनी प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत तपास सुरू केला. महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा तसेच जादूटोणा प्रतिबंध व निर्मूलन अधिनियम, २०१३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी नाकाबंदी करून संशयितांचा शोध घेतला. काही तासांतच पाच जणांना पकडण्यात पोलिसांना यश आले. या प्रकरणाचा पुढील तपास ब्राह्मणवाडा थडी पोलीस करीत आहेत.

Brahmanwada Crematorium Black Magic Incident
Amravati News : इबोलाचा धोका टळला; अंजनगाव सुर्जीतील तरुणाचा अहवाल 'निगेटिव्ह'

जिल्हा पोलीस अधीक्षक निकेतन कदम, अपर पोलीस अधीक्षक दत्ता तोतेवाड, सहायक पोलीस अधीक्षक ईशानी आनंद आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत जाधव, अमोल राऊत, राजू मरास्कोल्हे, हेमंत येरखडे आणि अनुप मानकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news