अमरावती| शेअर-क्रिप्टो करन्सीमध्ये दीड कोटींची फसवणूक

टोळीमधील महिलेसह पाच आरोपी गजाआड
Amravati 1.5 Crore Fraud in Share-Crypto Currency
तरुणीची आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात आले आहे.Pudhari Photo
Published on
Updated on

अमरावती, पुढारी वृत्तसेवा : शेअर मार्केट आणि क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुकीच्या नावावर लाभाचे आमिष देऊन तब्बल दीड कोटींची फसवणुक करण्यात आली. या प्रकरणी आंतरराज्यीय टोळीतील पाच आरोपींना शहर पोलीस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. यामध्ये एका महिला आरोपीचा देखील समावेश आहे. अटक केलेले आरोपी स्थानिक तसेच अकोला येथील रहिवासी आहेत. या संदर्भात शहर पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी गुरुवारी (दि.4 ) अधिक माहिती दिली.

काही दिवसांपूर्वीच शेअर मार्केट व क्रिप्टो करन्सी मध्ये गुंतवणूक करण्याच्या नावावर अधिक लाभाचे प्रलोभन देऊन एका महिलेची 1 कोटी 53 लाख 57 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यावर आर्थिक गुन्हे शाखा आणि सायबर सेल तपास करत होते. तपासादरम्यान अमरावती शहरातील एका तरुणीला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. तिने दिलेल्या माहितीच्या आधारे अकोला येथील शुभम गुलाये (वय.23), गौरव अग्रवाल(वय.23), नमन डहाके (वय.23), रवी मौर्या (वय.23) यांना देखील अटक करण्यात आली.

Amravati 1.5 Crore Fraud in Share-Crypto Currency
नोकरीचे अमिष दाखवून दांपत्याकडून युवकाची फसवणुक

या सर्व संशयित आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले होते. यांना (दि.5) जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात आरोपींकडून विविध बँकेचे पासबुक, एटीएम कार्ड, सिम आणि मोबाईल जप्त करण्यात आले आहे. फसवणूक झालेल्या रकमेपैकी 42 लाखांपेक्षा अधिक रक्कम ही वेगवेगळ्या 14 बँकेच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात आली आहे. तर उर्वरित रक्कम ही इतर बँकेच्या 216 खात्यांमध्ये ट्रान्सफर करण्यात आली होती. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Amravati 1.5 Crore Fraud in Share-Crypto Currency
आटपाडी शेअर मार्केट फसवणुक प्रकरणी संतोष ढेमरेला अटक; पुणे येथे सांगली पोलिसांची कारवाई

विदेशातून चालते फसवणुकीचे रॅकेट

पोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकारच्या सायबर फसवणुकीत मुख्य मास्टर माईंड हा विदेशातून हे रॅकेट चालवतो. बेरोजगार व आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या तरुण-तरुणींना या फसवणुकीच्या जाळ्यात अडकविले जाते. आणि त्यांच्या माध्यमातूनच ऑनलाइन फ्रॉड केला जातो. विशेष म्हणजे सर्वांना यासाठी ट्रेनिंग दिले जाते. आता पोलीस पकडलेल्या आरोपींची कसून चौकशी करत आहेत. त्यांच्याकडूनच अन्य मोठे खुलासे या प्रकरणात होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news