Amaravati Crime | टेलिग्राम जॉब स्कॅम: अमरावती पोलिसांची गुजरात, राजस्थानमध्ये धडक; आंतरराज्यीय टोळी गजाआड

ऑनलाइन फसवणुकीचे परदेशी कनेक्शन, क्रिप्टोकरन्सीतून व्यवहार
Nagpur Crime
डिजिटल अरेस्टfile photo
Published on
Updated on

अमरावती: 'टेलिग्राम' ॲपवरून ऑनलाइन जॉबचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या एका मोठ्या आंतरराज्यीय सायबर टोळीचा अमरावती सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी गुजरात आणि राजस्थानमधून चार संशयित आरोपींना जेरबंद करण्यात आले असून, या गुन्ह्याचे धागेदोरे परदेशापर्यंत पोहोचल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.

या कारवाईत अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अंकीत भगवंत बोरीया (वय २७, रा. उद्योग नगर, जि. जामनगर, गुजरात), दर्शन बलवंथाई रावल (वय ३४, रा. रणजीत सागर रोड, जि. जामनगर, गुजरात), गुरवीनसिंग मनमोहनसिंग खोकर (वय २३, रा. सुभाष चौक, रातनवाडा, जि. जोधपूर, राजस्थान) व भावेश इंद्रा गिरी (वय २१, रा. हिंदुस्थान गवारगेमजवळ, जि. जोधपूर, राजस्थान) यांचा समावेश आहे.

Nagpur Crime
Nagpur Crime | ईडी, 'डिजिटल अरेस्ट'ची भीती दाखवून निवृत्त अभियंत्याला २३ लाखांना गंडवले; ओडिशातून एकाला अटक

अशी झाली फसवणूक

या प्रकरणाची सुरुवात १४ जुलै रोजी झाली, जेव्हा अंजनगाव सुर्जी येथील एका नागरिकाने सायबर पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारदाराला 'टेलिग्राम' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका अनोळखी व्यक्तीने संपर्क साधून ऑनलाइन जॉबचे आमिष दाखवले. विश्वास संपादन करण्यासाठी, सुरुवातीला एका टास्कच्या बदल्यात ९७० रुपयांचा नफा देण्यात आला. यानंतर, मोठा परतावा मिळेल असे आमिष दाखवून तक्रारदाराला वेगवेगळ्या बँक खात्यांवर पैसे ट्रान्सफर करण्यास प्रवृत्त करण्यात आले. तक्रारदाराने २४ जूनपर्यंत एकूण ३,५६,४०३ रुपये ऑनलाइन पद्धतीने पाठवले. मात्र, कोणताही परतावा न मिळताच आरोपींशी संपर्क तुटला. फसवणूक झाल्याची खात्री होताच, पीडित व्यक्तीने अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी भादंवि कलम ४१६(२), ४१८(४) व माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६(ड) अंतर्गत गुन्हा नोंदवला.

तपासाची चक्रे आणि परदेशी कनेक्शन

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन, हा गुन्हा पुढील तपासासाठी सायबर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. तपासादरम्यान, पोलिसांनी आरोपींनी वापरलेल्या अनेक बँक खात्यांची माहिती मिळवली आणि डिजिटल पुरावे गोळा केले. या पुराव्यांच्या आधारे गुजरात व राजस्थानमध्ये तपासमोहीम राबवून वरील चार आरोपींना अटक करण्यात आली. या गुन्ह्यामध्ये मोबाईल हँडसेट आणि युएसडीटी (क्रिप्टोकरन्सी) असा एकूण ४ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या टोळीतील आणखी काही आरोपींचा शोध सुरू असून, फसवणुकीचे हे नेटवर्क परदेशातून चालवले जात असल्याची दाट शक्यता तपास यंत्रणांनी वर्तवली आहे.

Nagpur Crime
Telegram Double Money Fraud | टेलिग्राम अ‍ॅपवर ‘डबल पैसे’चा फंडा

यशस्वी कारवाई

ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरण वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तपास आणि कारवाईच्या या मोहिमेत पोलिस निरीक्षक गोपाल उपाध्याय, सहायक पोलिस निरीक्षक विलास सानप, पोलिस उपनिरीक्षक सुनील बनसोड यांच्यासह सायबर पोलीस स्टेशनचे प्रविण वानखडे, अजित राठोड, सागर धापड, अश्विन यादव, सरिता चौधरी, आणि पोलीस हवालदार रोशन लकडे, संदीप जुगनाके, पवन ढोके, पवन जाधव यांचा सक्रिय सहभाग होता. तसेच, अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अनिल सावळे आणि पोलिस हवालदार युवराज सोळंके यांनीदेखील महत्त्वपूर्ण योगदान दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news